फलटण येथे माऊलींच्या पालखीचे थाटात आगमन.
महाराष्ट्रातील सातारा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यातील फलटण तालुका सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व असलेला तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे याच संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्साह म्हणजे दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा हा या राज्यातला सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर मार्गावरील दक्षिणकाशी समजले व महानुभाव पंथातील चक्रपाणि महाराजांचा तीर्थक्षेत्र फलटण या ठिकाणी भाविक भक्तांनी उत्सवामध्ये ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचे स्वागत केले.
Comments
Post a Comment