जीवनावश्यक वस्तूंवरील दरवाढ मागे घ्या :रिपाईची मागणी.

जीवनावश्यक वस्तूंवरील दरवाढ मागे घ्या :रिपाईची मागणी. 


कोरेगांव प्रतिनिधि आज्जू मुल्ला.


जीवनावश्यक वस्तू सह अनेक दुग्धजन्य पदार्थाच्या किमती वर मोदीच्या केंद्र केंद्रातील सरकार ने पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होणार आहे या पाच टक्के जीएसटी मुळे अनेक जीवनावश्यक वस्तू म्हणजेच तांदूळ आता गहू बाजरी ज्वारी तसेच दूध दही पनीर लस्सी ताक या सर्वच वस्तूचे दरवाढ होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे कौटुंबिक जिवंतानं तणावामुळे जाऊ शकते याच सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे केंद्राने केलेली ही दरवाढ अत्यंत चुकीची आहे अगोदरच महागाई चा बकासुर मोदी शहा सारखा झाला आहे त्यातच महागाईचा महाबाकासुर करून देश आराध्येकडे नेण्याचा प्रकार या सरकारने केली आहे त्यांच्याच निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांनी दिली. 
केंद्र सरकारच्या मोदी विरोधात व्यापाऱ्यांनी जे आंदोलन उभारले आहे त्यास माननीय राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य कार्याध्यक्ष यांच्या आदेशाने आम्ही व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत केंद्र सरकारच्या चुकीच्या व मनमानी धोरणामुळे जीएसटी ची अंमलबजावणी केल्यामुळे महागाई तर वाढणारच आहे परंतु छोटे मोठे व्यापारी आणि दुकानदार उध्वस्त होणार असल्याने देशात कधी नवे तेच शेतीसाठी लागणारे यंत्र व खत यावर सुधाकर लागणार आहे तसेच रुग्णालयातील बेडवरती पाच टक्के कर तसेच हॉटेलच्या खोल्यांवरती सुद्धा 12% दर अशा प्रकारचे जीएसटी ची अंमलबजावणी करून जीएसटीचं भूत हे सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसवलेले आहे आणि अशा प्रकारचं देश उध्वस्त करण्याचा प्रकार मोदी सरकार करत आहे तरी जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी कपात करावी  व जीवनावश्य वस्तूची दर वाढ मागे घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ए च्या वतीने तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी उपस्थित कोरेगाव तालुका आर .पी .आय अध्यक्ष नितीन बोतालजी , कोरेगाव महिला आघाडी अमृता मोरे , राजेश बोताळजी , रमेश मोरे अभिजीत बोतालजी , माने व घाडगे यांनी तहसिल दार ऑफीस मधील डबडे साहेबांना निवेदन दिले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.