कोरेगाव तालुक्यातील ३४ रास्त भाव दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध: ३१ जुलै पर्यत अर्ज करता येणार.... ग्रामस्थांनी रेशन दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन....

कोरेगाव तालुक्यातील ३४ रास्त भाव दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध: ३१ जुलै पर्यत अर्ज करता येणार....
 ग्रामस्थांनी रेशन दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन....

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला


 कोरेगाव तालुक्यातील सध्या रद्द असलेले यापुढे रद्द होणारे राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची तसेच विविध कारणामुळे भविष्यात द्यावयाचे अशा कोरेगाव तालुक्यातील ३४ गावांसाठी रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत त्यासाठी ३१ जुलै २२,पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत रास्त भाव शिधावाटप दुकान परवाने मंजूर करण्याबाबत राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ६ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या प्राधान्यक्रमांका नुसार रास्त भाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २फेब्रुवारी २०२२,च्या शासन परिपत्रकानुसार रास्त भाव दुकान मंजूर करण्यासाठी वर्षभराचा सुधारित सहामाही कालबद्ध कार्यक्रम कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे कोरेगाव तालुक्यातील गावे पुढील प्रमाणे भावेनगर, मोरबेंद, फडतरवाडी, अरबवाडी ,खामकरवाडी, बोधेवाडी चिमणगाव, रिकीबदारवाडी,  वेलंग शिरंबे, शेलटी सायगाव एकंबे,वेलंग कन्हेर खेड,बर्गेवाडी, कवडेवाडी, परतवडी, बोबडेवाडी, राऊतवाडी, खडवाडी, अनुभल वाडी, बेलेवाडी, कोंबडवाडी, तांबी, रेवडी, घोरपडे वस्ती शिरढोण, मोहितेवाडी, तळवळे सं वाघोली, रामोशी वाडी,मध्यापूर वाडी ,अंबवडे सं कोरेगाव, लासुर्ण  नवलाई देवी, जरेवाडी, भिवडी, जगताप वस्ती सोनके, तारगाव आदी ठिकानी दुकाने मंजुंर करणेत येणार आहेत. जाहीरनामा ज्या भागासाठी प्रसिद्ध केलेला आहे त्याच भागासाठी क्षेत्रातील ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वंयम सहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास,महिला स्वयंसहायता बचत गट, व महिलांच्या सहकारी संस्था याप्रमाणे प्राधान्यक्रम असून या घटकांनी रास्त भाव दुकानासाठी स्वतंत्र अर्जाद्वारे मागणी करावी अर्ज संबंधित तहसीलदार कोरेगांव यांच्या कार्यालयात पाच रुपये किमतीला उपलब्ध होईल अर्जातील अटी, शर्ती ,कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज 31 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत शासन निर्णयानुसार इच्छुक संस्था, गट, यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह  तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेमध्ये मुदतीत अर्ज सादर करावेत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे आवाहन कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम यांनी केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.