१७ जुलै लढवैय्या लोकनेते मा.श्री.उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिनी युवक नेते श्री.नितीन धायगुडे यांचा विशेष लेख!
१७ जुलै लढवैय्या लोकनेते मा.श्री.उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिनी युवक नेते श्री.नितीन धायगुडे यांचा विशेष लेख!
फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.
फलटण. दखल प्रवाहासोबत वाहणाऱ्यांची नाही तर प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने वाहणाऱ्याचीच घेतली जाते. स्वता:च्या आयुष्यात येणाऱ्या असंख्या वादळांना पायदळी तुडवत जिद्दीच्या जोरावर एक शेतकरी कुटुंबातील मुलगा घरची जेमतेम परिस्थिती वडिलांचा शेतीचा व्यवसाय ते हि अस्मानी संकटाचा सामना करत कसेबसे घर चालेल एवढेच उत्पन्न शेतीमधून निघत. मात्र संस्कारांची संपत्ती अफाट वडिलांची शिकवण म्हणजे स्वतः कधी कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणावर अन्याय होत असेल तर तो कधी सहनही करायचा नाही या सूत्राप्रमाणे लहानपणापासून स्वावलंबी, कष्ट घेण्याची तयारी अंगी भिनली होती. प्राथमिक,माध्यमिक शिक्षणासोबत ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधून अव्वल क्रमांकाने पूर्ण केले. या दरम्यानच धानोरे या मूळ खेडेगावातून स्थलांतर वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी झालं. कॉलेज शिक्षण घेत असताना गरिबीचे चटके काय असतात ते पावलोपावली त्यांना जाणवत होते त्यात वेळोवेळी गरिबांवर, शेतकरी, दिन दलितांवर होणारा अन्याय हा त्यांच्या स्वाभिमानाला चटके देत होता. ऊस बागायदारांची कारखान्यांमार्फत प्रत्येक काट्यात रात्रंदिवस कष्ट करून घामाने पिकवललेया उसाची ४-५ टनांनी होणारी लूट मनात त्यांना सलत होती.एवढे पाहून शांत बसणारे ते उत्तमराव जानकर कसले!! ठिणगी पडलीच शेतकऱयांच्या मुलाने याबद्दल उठाव केला,लोकांमध्ये जागृती केली,पेटून उठण्याची धमक त्यांच्यामध्ये निर्माण करून लढण्याची प्रेरणा दिली.लोकांच्या येणाऱ्या अडचणींना स्वतःची अडचण समजून ती सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहिले पुढे जाऊन वेळापूर ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान झाले. एवढयावरच न थांबता स्थानिक व तालुक्यातील लोकांना रोजगाराची संधी हि तालुक्यातच निर्माण व्हावी यासाठी पण केला यातूनच १९९८ साली शेतकरी सहकारी साखर कारखाना , दूध संघ, पतसंस्था उभ्या केल्या यातून अनेक लोकांची सेवा घडत गेली.असंख्य हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. २००९ साली विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात कडवी झुंज देत राज्याचे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले. पुढे जाऊन २०१२ साली पंचायत समिती व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी निवडून जात संख्या बळ जुळवत उपसभापती पद हाती घेतले.पुढे २०१८ साली संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत धनगर समाज आरक्षणासाठी अखेरचा लढा उभा करत समाजजागृती केली. २०१९ साली पुन्हा राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी घेत विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. स्वकीयांनीच ऐन वेळेस दगाफटका केल्यामुळे थोडयाफार मतांनी पराभव पदरी पडला. मात्र लाखो मतदारांनी त्यांना आपला नेता मानले होते हे मिळालेल्या मतातून सिद्ध झाले. पुढे जाऊन जनसेवाचा वसा त्यांनी सोडला नाही उलट त्यास गती देत गावोगावी जाऊन सर्वांच्या अडचणी सोडवण्यात गुंतून घेतले. कोरोना सारख्या महामारीच्या कालखंडात धान्य बँकेची स्थापना करत शेकडो गरजू कुटुंबाना मदत केली. धुमस चित्रपटात मुख्य भूमिका पार पाडत त्यांनी आपल्यातील कलाकारही जपण्याचा प्रयत्न केला.तालुका सुजलाम सुफलाम व्हावं हरितक्रांतीची नांदी घडावी यासाठी विविध ठिकाणावरील तलावामध्ये पाणी साठवणूक करून त्याचा फायदा शेतकऱयांना व्हावा यासाठी साठवणूक केलेले पाणी थेट झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रकल्पास त्यांनी गती दिली यातून शेतकऱयांची आर्थिक सुधारणा व्हावी हा प्रामाणिक प्रयत्न वेगाने सरकारच्या मदतीने सत्यात उतरवत आहेत. फक्त आश्वासन देऊन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत तर ते किती तातडीने कृती करून सुटतात याला महत्व असते.मा.श्री.उत्तमरावजी जानकर यांच्या राहत्या घरी दररोज जवळपास शे दोनशे लोक आपल्या नानाविध अडचणींची जलद सोडवणूक करून आनंदाने परतत असतात हेच आशीर्वाद आपणास नक्कीच भविष्यात अजून मोठी लोकसेवेची संधी दिल्याखेरीस राहणार नाहीत. घरावर तुळशीपत्र ठेवून पायाला भिंगरी बांधून लोकसेवेसाठी जे आपण संपूर्ण सोलापूर जिल्हा व माळशिरस तालुका पिंजून काढत आहात लाखो दुःखीत व पिढीतांना जो आधारस्तंभ बनून पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहेत यासाठी आपले कितीही आभार मानले तरी उतराई होणे शक्य नाही. असच कायम लढत राहून आपल्या हातून अजून गतीने शोषित ,पिढीत,वंचित, शेतकरी, कष्टकरी यांची सेवा घडो!! असेच लोककल्याणकारी नेते मा.श्री.उत्तमरावजी जानकर साहेब आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो,वाढदिवसाच्या आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!
*शब्दांकन-श्री.नितीन धायगुडे*
Comments
Post a Comment