माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना विधान परिषदेवर संधी दयावी. खटाव माण तालुक्यातील जनतेची मागणी.

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना विधान परिषदेवर संधी दयावी. खटाव माण तालुक्यातील जनतेची मागणी.

पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.

 माण-खटाव तालुक्यातील अभ्यासु नेतृत्व पाणी योजनाचा परिपूर्ण अभ्यास असणारे माण खटाव तालुक्याचा बुलंद आवाज भाजपाचे जेष्ठ नेते तथा मा.आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मागणी नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्यपाल महोदय यांच्याकडे करणार असल्याचे आण्णासाहेब कोळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 
      महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री पदाची शपथ ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांची नवी यादी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा असे एकुण १३ उमेदवार पाठवण्याचे संकेत दिल्याची सूत्रांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दीड वर्षांपूर्वीच या जागांसाठी आपल्या १२ सदस्यांची नावे पाठवली होती. त्यानंतर तत्कालीन सरकार मधील नेत्यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ही नावे जाहीर करण्याची विनंती केली. पण, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारच्या नव्या यादीवर ते कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातून ज्यांनी भाजपाची सुरुवात केली असे महाराष्ट्रामध्ये मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ. दिलीपरावजी येळगावकर यांना भाजपाने विधानपरिषदेवरती संधी देऊन निश्चितच त्यांचा सन्मान करावा.विशेषतः दुष्काळी भागाचा विकास व्हावा विविध प्रश्न सोडवण्याकरिता नेहमी आक्रमकता व लढवय्या नेता म्हणून यांच्याकडे सबंध महाराष्ट्र पाहत आहे.डॉ.येळगावकर यांनी दुष्काळी माण- खटाव तालुका सोबतच दुष्काळी माणदेशातील माण,खटाव, आटपाडी,सांगोला,जत,मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नावर अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवून शासन दरबारी न्याय मीळविला आहे. अशा कर्तव्यदक्ष जेष्ठ नेत्यांचा भाजपाने सन्मान करून राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मागणी आण्णासाहेब कोळी हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्यपाल महोदय यांच्याकडे माणदेशी शिष्टमंडळ घेऊन करणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.