ग्रामीण भागातील जनहित लक्षात घेऊन थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक व्हावी !
सातारा न्यूज - अजू मुल्ला.
ग्रामीण भागातील लोकहित लक्षात घेऊन गटातटाचे भावकीचे आणि जातीवादाचे राजकारण संपवण्यासाठी पुन्हा थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक होणे आवश्यक आवश्यक असून राज्यात 27 हजार 800 पेक्षा आदी ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्ष भांडण तंटे होऊन तरुणाची भवितव्य धोक्यात आले आहे हीच बाब समोर ठेवून सरपंचाची निवड जनतेतून हवी अशी मागणी सरपंच परिषद संघटना कोरेगाव यांच्या माध्यमातून कोरेगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
. 2017 सालि विधिमंडळात थेट जनतेतून सरपंचाची निवड व्हावी हा कायदा पारित केला होता तो आघाडी सरकारने 2019 मध्ये रद्द केला त्या विरोधात सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ने आक्रमक भूमिका घेतली परंतु तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याचे प्रचंड वाईट परिणाम ग्रामीण भागाच्या विकासावर झाले.
. सध्या राज्यात सत्तांतर झालेले आहे या सरकारची मानसिकता ही ग्रामीण भागाच्या हिताची आहे असे सरपंच परिषदेचे मत आहे त्यामुळे पुन्हा थेट जनतेतून सरपंचाची निवड व्हावी यासाठी विधिमंडळात ठराव पास करून त्यांचे कायद्यात रूपांतर व्हावे ही मागणी सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे तसेच उपसरपंच व सदस्यांच्या अधिकारात वाढ व्हावी यासाठी सरपंच परिषद आग्रही आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीत काही त्रुटी असतील तर पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नियुक्त करावी व त्या दुरुस्ती करावी. या कमिटीत सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचा प्रतिनिधी असावा सरपंच परिषदेने राज्य कार्यकारणी दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत थेट जनतेतून सरपंच असावा. असा ठराव पारित केला आहे. तसेच हा निर्णय सरकारने घ्यावा याबाबत प्रत्येक तहसीलदार कार्यालयात त्या त्या तालुक्यातील सरपंचांनी एकत्र येऊन सोमवार दिनांक 11 जुलै 2022 रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयात निवेदन देऊन जनतेच्या भावना सरकारला कळवण्याचा निर्णय झाला त्यास अनुसरून आज 11 जुलै रोजी कोरेगाव परिषदेच्या वतीने कोरेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य विश्वस्त तथा सातारा जिल्हा कार्याध्यक्ष माननीय आनंदराव जाधव, कोरेगाव तालुका सरपंच परिषद अध्यक्ष माननीय एडवोकेट राजेश चव्हाण, उपाध्यक्ष माननीय सुरेश कांबळे, जिल्हा सरचिटणीस माननीय पांडुरंग सपकाळ, कोरेगाव तालुका सचिव माननीय गोविंद कदम, तालुक्यातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
Comments
Post a Comment