विसापूरमध्ये राहत्या घरात वृध्द पती पत्नीचा खुन.

विसापूरमध्ये राहत्या घरात वृध्द पती पत्नीचा खुन.

 पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.

 विसापूर ता. खटाव येथे वृद्ध पती व पत्नी यांचा राहत्या घरात खुन करण्यात आला यामध्ये हनुमंत भाऊ निकम वय 70 वर्षे  व कमल हनुमंत निकम वय 65 वर्षे अशी नावे  असून विसापूर व परिसरात एकच खळबळ माजली आहे या खुणाची नोंद पुसेगांव पोलीस ठाणे मध्ये झाली आहे. घटनास्थळावरून व गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार वृध्द पती पत्नी यांचा खुन वेगवेगळ्या, खोलीत दोन दिवसापूर्वीच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर दरवाज्याला कडी होती घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्या घरातील नागरिकांनी निकम यांच्या घराची कडी उघडली असता दोन्हीही पती पत्नीचे मृतदेह झोपलेल्या जागेवर पडले होते.त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलेली माहिती पुढे आली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कमल हनुमंत निकम यांच्या गाळ्यातील   दागिने देखील गायब झाले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.ही घटना शनिवार  सायंकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी पुसेगांव पोलीस स्टेशचे सपोनी  संदीप शितोळे यांना दिल्यानंतर  कोरेगांवचे डी. वायएसपी. गणेश किंद्रे यांच्यासह शॉन पथका व बिंटअंमलदार आनंदा गंबरे आदी  घटनेवर हजर झाले  रात्री घटना स्थळावरून पंचनामा केला आहे व मृतदेह शव विच्छेदनासाठी सातारा येथे हलवण्यात आले या डबल खुन कोणी केला याची अदयापही माहिती समोर आली नाही याचा तपास सपोनी संदीप शितोळे   करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.