कोरेगाव साठी 20 कोटींचा निधी मंजूर.

कोरेगाव साठी 20 कोटींचा निधी मंजूर. 


कोरेगाव प्रतिनिधी अज्जू  मुल्ला. 


कोरेगाव नगरपंचायतीसाठी सत्तेत आलेल्या नव्या सरकारने नागरी सुविधा सहाय्य योजनेतून तब्बल वीस कोटींचा निधी मंजूर केला आहे . हा निधी मंजूर झाल्याने शहरातील सर्व विकास कामे जलद गतीने मार्गी लागणार आहे. मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, नगराध्यक्ष सौ. दिपाली बर्गे , उपनगराध्यक्ष सुनील  बर्गे , यांनी माहिती दिली. महा विकास आघाडी सरकारमध्ये नगर विकास मंत्री असताना ना. एकनाथ शिंदे यांनी कोरेगावला भरभरून निधी दिला होता. नामदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात आमदार महेश शिंदे यांनी सहभाग घेत त्यांना साथ दिली होती, त्याचे फळ आता कोरेगावला मिळत आहे नामदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई बेंगलोर औद्योगिक कॉरिडोअर मध्ये कोरेगावात एम.आय डि .सी उभारण्याला मंजुरी दिली. वी त्यामुळे कोरेगावात औद्योगिक वसाहत सुरू होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे यानंतर आता कोरेगाव शहरातील विकास कामासाठी तब्बल 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे .त्यामुळे विकास कामांना आता कधी येणार आहे. या निर्णयामुळे कोरेगाव कराना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे. या निधीमधून जवाहर भोसले ते भानुदास बर्गे फुलाई परिसरात कॉंक्रिट रस्त्यासाठी एक कोटी 75 लाख बर्गे घर जगताप घर रस्ते काँक्रिटीकरण व नाल्यांसाठी  १ कोटी ७५ लाख , प्रभाग एक मधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी १ कोटी ५० लाख , प्रभाग 3 मधील रस्ते व नाल्यांसाठी १ कोटी ५० लाख , प्रभाग क्रमांक चार मधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी  १ कोटी ५० लाख , प्रभाग क्रमांक सहा मधील रस्त्यांसाठी व गटारा साठी १ कोटी ५० लाख ,प्रभाग क्रमांक सात मधील रस्त्यांसाठी व गटारांसाठी  एक कोटी , प्रभाग क्रमांक 12 मधील रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी  एक कोटी , प्रभाग क्रमांक आठ मधील रस्त्यांसाठी पन्नास लाख , प्रभाग क्रमांक 12 मधील रस्ते  व  नाले बांधण्यासाठी 50 लाख, प्रभाग क्रमांक 13 मधील रस्ते व गटार बांधकामासाठी दीड कोटी , प्रभाग क्रमांक 14 मधील रस्ते व नाले बांधकामासाठी दीड कोटी, आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधील रस्ते आणि गटार बांधकामासाठी दीड कोटी प्रभाग क्रमांक 16 मध्ये ट्रिमिक्स काँक्रिट रस्ते व बंदीस्त गटारांसाठी एक कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.