13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा कार्यक्रमाचे आयोजन करणार :- प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे.

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा  कार्यक्रमाचे आयोजन करणार :-  प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे.

कोरेगाव प्रतिनिधी - आज्जु मुल्ला. 


आझादीच्या  अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या  15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने ज्या सूचना प्राप्त आहेत त्यां अनुषंगाने  दिनांक 9 ऑगस्ट 17 ऑगस्ट च्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन  करणे, त्याचप्रमाणे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे प्रतिपादन प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी केले आजादी का महोत्सव कार्यक्रमाचे नियोजनासाठी निमित्ताने आयोजित प्रांत कार्यालय कोरेगाव येथे  तालुक्यातील सर्व प्रशासकीय खाते प्रमुखांची आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल कदम डि वाय एस पी गणेश किंद्रे नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे रणजीत जाधव निलेश ढेरे विजया घाडगे क्रांती बोराटे तलाठी शंकरराव काटकर यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते..
प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी
15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने  आवश्यक त्या सर्व सूचना संबंधीत खाते विभागाना दिल्या. तसेच  प्रत्येक विभागाच्या कार्यालय प्रमुख  यांनी या अनुषंगाने ते कोण कोणते कार्यक्रम प्रस्तावित करणार आहेत.  कोणत्या कार्यक्रमाचे  घ्यावयचे  नियोजन करणार आहेत, याबाबतची माहिती पुढच्या दोन दिवसात देण्याबाबतचे आदेश यांवेळी  देण्यात आले आहेत.
अश्या प्रकारे यावेळी 15 ऑगष्ठ 2022 रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करावयाचा आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली असल्याच्या  कारणाने अमृत महोत्सवाचे अनुषंगाने विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्याचे नियोजन आढावा बैठकीत प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी केले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.