पुणे चिंचवड परिसरात डांगे चौका मध्ये SKD Creative Driver Service या ऑफिस चे उद्घाटन उत्साहात संपन्न.
फलटण प्रतिनिधी..दादा दळवी.
पुणे चिंचवड परिसरात डांगे चौका मध्ये तिघे पार्टनर कुणाल जाधव. शुभम सावंत. ज्ञानेश्वर चव्हाण. यांनी एकतेच प्रतीक बाळगत एकमेकांच्या विचाराने SKD creative driver service कार्यालय स्थापन करण्यात आले असून आज रोजी या कार्यालयाचे रिबीन कापून उदघाटन उत्साहात संपन्न करण्यात आला. या ड्रायविंग सर्व्हिस च्या माध्यमातून पुणे शहरात 24 तासामध्ये कधीही कोठेही गरजू लोकांना वेळेत सेवा उपलब्ध होऊन त्यांची गरज पूर्ण व्हावी हा उद्धिष्ट आहे. आता ह्या कार्यालयाच्या माध्यमातून गरजू लोकांना व ड्रायव्हर म्हणून काम करणारे अनेक ड्रायव्हर कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना साहेब तसेच सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी राजाभाऊ मदने साहेब. सुरेश सावंत , सचिन जंगम , किरण सावंत. गणेश जाधव. राजेंद्र मोरे, दत्तात्रय टिपरे.योगेश मदने. त्याचबरोबर महिला वर्गातील सोनाली जाधव. क्रांती चव्हाण. दीपाली मदने आदी मान्यवर उपस्थितीत होते.
Comments
Post a Comment