माण खटावचे प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
माण-खटाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी साहेब यांना नुकताच भारत सरकार प्रमाणित राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर झाला
माण खटाव तालुक्यात प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी हरित वसुंधरा उपक्रम यशस्वीपणे राबवून त्यासंदर्भात हरीत चळवळ उभी केली आहे ते प्रशासकीय कामाबरोबर पर्यावरणाचा कार्यातही सदैव अग्रेसर राहतात त्यांनी आपल्या पर्यावरण प्रेमी ची झलक प्रांत कार्यालय परिसरात विविध जातीचे झाडे ,फुलांची झाडे, पालेभाज्या, फळांची झाडे, आदी विविध प्रकारची हजारो झाडांचे वृक्षारोपण केली आहेत व तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापुर ता माण येथेे 75 हेक्टर क्षेत्रात हरित वसुंधरा उपक्रम राबवून पर्यटन स्थळ बनवण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या याच पर्यावरणपूरक विचारांची व कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
दिनांक 5 जून रोजी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे, सामाजिक वन विभाग महाराष्ट्र राज्य मुख्य वनरक्षक रंगनाथ नायकुडे ,विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव ,ज्येष्ठ सिने अभिनेते भारत गणेशपुरे, जय राम नारायण ,आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू एडवोकेट कोमल सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment