कोरेगावातील आझाद चौकातील सततच्या तक्रारीचा केंद्रबिंदू झालेले स्वच्छतागृह नगर पंचायतीने अखेरीस पाडले ; नागरिकांमध्ये समाधान.

कोरेगावातील आझाद चौकातील सततच्या तक्रारीचा केंद्रबिंदू झालेले स्वच्छतागृह नगर पंचायतीने अखेरीस पाडले ; नागरिकांमध्ये समाधान 

 कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला 

कोरेगाव शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या आझाद चौक परिसराने अखेरीस मोकळा श्‍वास घेतला आहे. भाजी मंडईच्या आवारात असलेले स्वच्छतागृह नगरपंचायतीच्यावतीने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. या स्वच्छतागृहाबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे व माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी स्वत: उभे राहून स्वच्छतागृह पाडण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 
प्रभाग क्रमांक दोनमध्ये येत असलेल्या आझाद चौक परिसरातील भाजी मंडईनजिक स्वच्छतागृह ग्रामपंचायतीमार्फत उभारण्यात आले होते. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह एकाच इमारतीत होते, मात्र तेथे सातत्याने दुर्गंधीचे साम्राज्य असल्याने परिसरातील रहिवासी, व्यापारी व व्यावसायिक वैतागले होते. नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी आझाद चौकातील मंडई परिसराचा विकास करत असताना सर्वात प्रथम स्वच्छतागृह पाडले जाईल, अशी ग्वाही दिली होती. 
नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्रालयामार्फत आझाद चौक भाजी मंडई व व्यापारी संकुलासाठी ८ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर कागदोपत्री सोपस्कर पूर्ण केले जात असून, मंडई व व्यापारी संकुलाच्या उभारणीस कमीत कमी सहा महिन्यांचा काळ जाणार आहे. आझाद चौकातील नागरिकांच्या मागणीवरुन त्यापार्श्‍वभूमीवर आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे व माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी स्वच्छतागृह पाडण्याचा  निर्णय घेतला. जेसीबीद्वारे स्वच्छतागृह पाडण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 
कोरेगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमदार महेश शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. विकासकामे करत असताना शहराच्या सुशोभिकरणाकडे आणि स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. आझाद चौक भाजी मंडई व व्यापारी संकुलासाठी ८ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर आता प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. आझाद चौक परिसरात भव्य संकुल उभे राहणार असून, तेथे महानगरांच्या धर्तीवर आधुनिक भाजी मंडई व प्रशस्त पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे यांनी दिली. 
चौकट : [नवीन स्वच्छतागृह अवघ्या दीडशे मीटरवर
आझाद चौकातील स्वच्छतागृह पाडत असताना, नगरपंचायतीने तांदुळवाडकर कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या शौचालयाच्याठिकाणी स्वच्छतागृह तयार करण्यात आले आहे. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, तेथे पाण्याची पुरेशी व्यवस्था देखील आहे. नागरिकांनी या स्वच्छतागृहाचा वापर करत असताना स्वच्छता ठेवावी व नगरपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक साईप्रसाद बर्गे यांनी केले आहे.]

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.