एल के सरतापे हे माणुसकी दातृत्व कर्तृत्व नेतृत्व जपणारे भंडार अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार.

एल के सरतापे हे माणुसकी दातृत्व कर्तृत्व नेतृत्व जपणारे भंडार  अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार


पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
 सामन्यातील सामान्य घरातील व्यक्ती कोणता हि स्वार्थ न ठेवता माणुसकीच्या नात्याने शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य,शैक्षणिक गणवेश आदीची मदत करणार्या व आपल्या पत्रकारीतेतुन समाज हिताला प्राधान्य देणार्या बातम्या देणारे व आम्ही जेथे चुकतो ती चुक आमची सडेतोड  दाखवण्यात एल के  मागे सरला नाही ऐवढच काय कोव्हीड मध्ये एल के नंतर अनेकांनी काम केले मात्र एल के याने लाॅकडाऊन मध्ये हाॅस्पिटल ,दवाखाना ,वेडसर, फिरस्ती, बेवारस कोव्हीड व वृध्दासाठी दोन वेळचे  मोफत जेवन देण्याचा उपक्रम तर म्हसवड व परिसरातील नागरीकांचे कोव्हीडच्या महामारीत बेड, अॅक्शिजन मिळत नव्हते त्या वेळी एल के पहिल्यांदा पुढे आला त्या कामाची तुलनाच करता येणार नाही एल के सरतापे हा दातृत्व, कर्तव्य व नेतृत्व या तिन गुणांचा संगम म्हणजे एल के असल्याचे प्रतिपादन म्हसवड पालिकेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने यांनी व्यक्त केले
     फलटण एज्युकेशन सोसायटीचे सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर काॅलेज म्हसवड या शाळेचे सेवक कर्मचारी लक्ष्मण किसन सरतापे( एल के) यांच्या सेवानिवृत्तचा कार्यक्रम सिध्दनाथ हायस्कूल मध्ये घेण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्रीमंत अजितराव राजेमाने प्रमुख पाहुणे स्कुल कमिटीचे व्हा. चेअरमन अॅड पृथ्वीराज राजेमाने,  माजी नगराध्यक्ष नितीन जोशी, शिवराज   राजेमाने, विपूल दोशी, संभाजी माने, प्रमुख उपस्थीती माजी नगराध्यक्ष, विलासराव माने, माजी नगराध्यक्ष  भगतसिंग विरकर, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय  धट,माजी नगराध्यक्ष शहाजी लोखंडे, म्हसवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, माजी नगरसेवक कैलास भोरे, माजी नगरसेवक विनोद रसाळ, माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, माजी केंद्र प्रमुख जगन्नाथ विरकर, केंद्रप्रमुख बापू शेटे, राजेंद्र मोडासे, डॉ राजेश शहा ,,परेश व्होरा, जयराज राजेमाने, आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते
  यावेळी श्रीमंत अजितराव राजेमाने पुढे म्हणाले मैत्री कशी असावी हे एल के कडुन खरेच शिकावे,  एकाद्या बातमीचा पाठपुरावा करुन  सत्य बाहेर आणण्याचे काम नेहमी करत असल्याने त्याच्या लेखणीची ओळख जिल्ह्याने पाहिली लाॅकडाऊन व कोव्हीड मध्ये केलेल्या कामाची तुलनाच होऊ शकत नाही लोकांसाठी सतत धडपडणारी व्यक्ती शाळेत कामाला लागण्या आधी पालिकेत काम करत होता या ठिकाणी राजकीय द्वेषातुन पालिकेत काम करत असताना त्याच्या वर अन्याय झाल्यानंतर हायस्कूल मध्ये  कामाला लागले एका ठिकाणी पुर्ण सर्विस प्रामाणिक करुन समाज हिताला प्राधान्य दिले हे करत असताना पत्रकारितेतुन सडेतोड लिखान करुन अनेकांना न्याय दिला 
असा त्रिवेणी कामाचा संगम असलेल्या एल के सरतापे असल्याचे राजेमाने यांनी सांगितल

       यावेळी स्कुल कमिटीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष    नितीन दोशी म्हणाले एल के सरतापे यांच्या- सेवानिवृत्तीचा सत्कार आहेच पण त्याचबरोबर त्याने  केलेल्या सेवेचा सामाजिक कामाचा आज खऱ्या अर्थाने सत्कार होतोय आज, सेवानिवृत्त तुम्ही कधी होणारच नाही
तुमची ही सेवा खंड चालू राहील सामाजिक जिवनात राजकीय जिवनात आणि पत्रकारितेत तुमचे काम अखंडपणे चालू राहील सामाजिक काम करत असताना घराकडेही कधीही दुर्लक्ष केले नाही एक शिपाई माणुस एवढ्या तुटपुंज्या पगारात दोन मुलं डाॅक्टर,एक मुलगी इंजिनिअर एक मुलगा आरोग्य विभागाचे शिक्षण दिले एल के तुम्ही धनाने जरी श्रीमंत नसला तरी शिक्षणाने फार श्रीमंत आहात यासर्वा मागे खरे तर तुमच्या पत्नीने मोठी जबाबदारी पार पडली आहे त्याचे हि कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे नितीन दोशी म्हणाले
   प्रशालेचे प्राचार्य प्रविण दासरे म्हणाले  सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येवून असामान्य व्यक्तीमत्व एल के तुम्ही तुमच्या शाळेच्या कामा बरोबर सामाजिक पत्रकारिता यांना एकप्रकारे न्याय दिला तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत नेहमीच प्रामाणिक राहीला याचे मला कौतुक आहे, २७ वर्षे एका ठिकाणी प्रामाणिक उत्तमरित्या सेवा केली हे एका वर्षात तुमचे काम पाहिले म्हणूनच आज तुमच्या सेवेचा सत्कार होत आहे कामाला प्राधान्य देणारे कष्टाळू प्रामाणिकपणे सेवा बजावणारे कर्मचारी तुमच्या सारखा।
कर्मचार्याचीया संकुलनाला गरज आहे. तुमची उणीव 
राहणार आहे. जेव्हा जेव्हा शाळेला अडचण येईल तेव्हा तेव्हा विलंब न करता तुम्ही ती दूर करण्यासाठी आपली शाळा म्हणून यावे तुम्ही जरी सेवानिवृत्त होत आसला तरी शाळे विषयी असणारे प्रेम, आमच्या विषयी असणारं प्रेम, विश्वास, आपुलकी हा सदैव रहावे आपण जिथे जाचाल तिथे आपली छाप सोडून जाणारे काम नेहमी आपल्या कडुन घडावे असे शवटी प्राचार्य दासरे म्हणाले
 
     यावेळी   विलासराव माने म्हणाले याने त्याच्या लेखनीतून बरेच प्रश्न सोडवलेत. आणि ती धडपड
येथून पुढे अशीच चालु ठेवावी सर्वसामान्य लोकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम जोमाने करावे शाळेतील सामाजिक काम, पत्रकारितेतुन केलेले काम व कोव्हीड व लाॅकडाऊन मध्ये केलेल्या कामाची पोहच येथे उपस्थित असणाऱ्या सर्वच राजकारण्यांनी समाजकारणात संधी द्यावी असे विलासराव माने शेवटी म्हणाले
 विजय सिन्हा म्हणाले ज्याप्रमाणे रामाच्या मागे खंबीर लक्षूमन आसतो त्याप्रमाणे या लक्ष्मणचे काम प्रामाणिक निस्वार्थी केल्यानेत आज एल के  या  त्याच्या नावात त्याने वेगळा दबदबा ठेवला आहे तहसील कार्यालय पोलीस, कृषी आरोग्य याठिकाणी एखाद्या व्यक्तीने एल के सरतापे यांनी पाठवले आहे असे सांगीतले तर त्या व्यक्तीचे काम नक्की होणार ऐवढी ताकत एल के यानावात करु ठेवली आहे जितं आम्ही चुकतो तेथे हि आम्हाला सोडले नाही मी जवळचा तो लांबचा असा लिखाणात भेदभाव केला नाही आज पासुन तर एल के मोकळा झाला आहे एल के लिह पण संपूर्ण उघडे करु नको रे बाबा असे विजय सिन्हा म्हणाले
 यावेळी प्रा विश्वंभर बाबर प्रा रमेश मोरे,विजय टाकणे  व जगन्नाथ विरकर  यांनी आपली मते व्यक्त केली
 कार्यक्रमाचे आभार मानताना स्कूल कमेटीचे व्हा चेअरमन पृथ्वीराज राजेमाने म्हणाले एल के सरतापे यांनी केलेले शाळेचे प्रामाणिक , निर्भीड  पत्रकारिता व सामाजिक काम प्रामाणिक केल्यानेच आज सर्व म्हसवड मधील नेते मंडळीना एकत्र आणण्याचे काम या निमित्ताने एल के यांनी केले आसुन या कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानले तर सुत्रसंचालन राजू तोरणे गुरुजी यांनी केले तर प्रस्तावना अजित काटकर व संतोष देशमुख यांनी केले 
 या कार्यक्रमास नुतन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, गंबरे , गणेश माने, प्रदिप तावरे, संजय सासणे, विजय नांगरे, सुशील भोसले, बापू मिसाळ, नागनाथ डोंबे, संजय टाकणे, धनंजय पानसांडे, सुशील त्रिगुणे, महेश कांबळे
    
  अनिल देसाई 
एल के सरतापे हे माणुसकी जपणारे भंडार आसुन त्याचा मित्रत्व विरोधी गटा बरोबर सत्ताधारी असो वा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आपलेसे वाटणारे एल के असल्याचे मत सत्कारा दरम्यान व्यक्त केले
    बाजीराव ढेकळे म्हसवड पोलीस स्टेशन
सरतापे यांनी नोकरी करत जोपासलेली सामाजिक कामातून मुलांच्या शिक्षणासाठी धडपड हि कौतुकास्पद आसुन कामगार पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून तिन कार्यातील काम वाखाणण्याजोगे आसुन त्यांनी हे घेतलेले काम असेच पुढे सुरु ठेवण्यास परमेश्वर ताकत देवो असे सत्काराच्या वेळी म्हटले

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.