अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अवघ्या तीन तासात पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात.

अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अवघ्या तीन तासात पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात. 

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अपहरण करून अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिजीत ज्ञानदेव फडतरे वय 31 वर्षे  फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या आरोपीस अवघ्या तीन तासात शोध घेऊन गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
.    पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे पुसेगाव  पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 26. 6 .2022 रोजी रात्री बाराच्या सुमारास फिर्यादी जयश्री महेश मोरे वय 35 वर्ष  राहणार रविवार पेठ सातारा महेश मोरे व दाजी उत्तम होळ तसेच त्यांची दोन मुले वेदांतिका वय आठ वर्ष व विश्वजीत गोरे वय चार महिने ऋतिका उर्फ रूपाली उत्तम होळ वय 21 वर्षे किनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांचे बरोबर शिंगणापूर येथून सातारा येथे हुंडाई आय टेन गाडी क्रमांक एम एच 11 सी जी 81 81 या गाडीने जात असताना महेश गोरे व उत्तम होळ हे पाणी घेण्यासाठी पुसेगाव येथील शिवाजी चौक येथे थांबून चौकातील पानटपरी येथे पाणी बॉटल आणण्यासाठी उतरून गेले असता आरोपी फडतरे हा गाडीचे ड्रायव्हर सीटवर अचानकपणे येऊन बसून गाडी चालवून त्यांची दोन लहान मुले तसेच फिर्यादी व त्यांची भाची तिला  वाईट हेतूने पळवून घेऊन गेला होता.त्या वेळी सदर गाडीतील फिर्यादी यांनी अनोळखी इसम फडतरे यास  प्रतिकार करते वेळी झालेल्या झटापटीत चार चाकी गाडी येरळा नदीच्या पुलाचे पुढे रस्त्याच्या खाली उतरून ती बंद पडली त्यावेळी फिर्यादी जयश्री हिने आरडाओरडा केला असता,  सदर अनोळखी इसम याने  फिर्यादी जयश्री यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत फिर्यादी जयश्री यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
तर घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय उपविभागीय अधिकारी  गणेश किंद्रे साहेब,  सपोनि संदीप शितोळसाहेब , यांनी तात्काळ गुन्ह्याची घटनास्थळाला भेट देऊन, संशयित आरोपीचे शोध कामी पुसेगाव पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार  यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून व सूचना देऊन अनोळखी आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले.त्यानंतर पुसेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी शिवाजी चौक पुसेगाव येथील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी  करून संशयित इसमाचा शोध घेण्यासाठी पुसेगाव शहरातील परिसर पिंजून काढला असता, एक संशयित इसम हा पुसेगाव ते दहिवडी रोडला महालक्ष्मी हॉटेलच्या आडोशाला लपून बसलेला दिसल्याचे त्यांचा पोलिसांना संशय आल्यानें त्यास ताब्यात घेऊन पुसेगाव पोलीस ठाणे येथे आणले. व त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि संदीप शितोळे साहेब, करीत आहेत. या कारवाईमध्ये सपोनि संदीप शिंदे सह पोलीस हवालदार एस एस भोसले, पोलीस हवालदार डी .बी .बर्गे,पोलीस नाईक सचिन जगताप, पोलिस नाईक सुनिल अब्दगिरे,महिला पोलीस नाईक पी. एल. जगदाळे, पोलीस शिपाई महेश पवार, यांनी सहभाग घेतला होता अशाप्रकारे घडल्या अति गंभीर गुन्ह्याचा पोलिसांनी तात्काळ कसोशीने शोध घेऊन आरोपीस अवघ्या तीन तासात अटक करून गुन्हा उघड केल्यामुळे फिर्यादी तसेच सातारा जिल्हा बार कौन्सिल यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केलेली आहे. तसेच पुसेगाव व परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने पुसेगाव पोलिस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.