नम्रता भोसले विद्यार्थिनीचा गुंडोजीबाबा विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक.

नम्रता भोसले विद्यार्थिनीचा गुंडोजीबाबा विद्यालयामध्ये  प्रथम क्रमांक

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

 विसापूर ता.खटाव येथील श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर मधील कुमारी. नम्रता अनिल भोसले या विद्यार्थिनीने एस एस सी परीक्षेमध्ये 96 टक्के मार्क मिळवून विद्यालयामध्ये  प्रथम क्रमांक मिळवला तर दुसरा क्रमांक पूजा राजेंद्र शिंदे 95 टक्के, तिसरा क्रमांक साक्षी विठ्ठल कदम 93%, मार्क मिळाले तर विद्यालयांमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणारे एकूण नऊ विद्यार्थी आहेत परीक्षेत बसलेले विद्यार्थी 37 असून यामध्ये 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर एका विद्यार्थिनीचा निकाल तांत्रिक अडचणीमुळे राखीव मात्र तिचे एकूण मार्क 81 टक्के आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  आमदार महेश शिंदे , युवानेते हरिश्चंद्र सावंत,  सरपंच नीलम जगताप, माजी उपसरपंच बाळासाहेब सावंत, पैलवान दीपक सावंत, माजी उपसरपंच मुरलीधर (बापू) साळुंखे, नामदेव (आण्णा) सावंत, भीमराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुनीता मोहिते ,स्मिता सावंत, शाळेचे मुख्याध्यापक  जाधव .एच .डी ,कांबळे. टी. आर ,जाधव. टी .व्ही, शिंदे. ए. के , प्रभावळे. एस. एस,  कु .जाधव. एस.एन , सौ शिंदे. एस. एम. या शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षकेत्तर कर्मचारी,  चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे खटावचे सन्माननीय अध्यक्ष अजितराव पाटील (काका), आजी माजी सैनिक  संघटनेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विसापूर सेवा सोसायटीचे चेअरमन व सदस्य, विविध मंडळांचे अध्यक्ष, महिला बचत गट ,पदाधिकारी ग्रामस्थ, महिलावर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.