आमदार महेशदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून कोरेगाव शहरासाठी १५ कोटींच्या निधीचा बंपर धमाका.



कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला 


आमदार महेशदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून कोरेगाव शहरासाठी १५ कोटींच्या निधीचा बंपर धमाका; आझाद चौकामध्ये भव्य व्यापारी संकुल, भाजी मंडई व पार्किंग सुविधा
कोरेगाव : संपूर्ण कोरेगाव शहरात होणार ट्रिमिक्स कॉंक्रीटचे रस्ते आणि बंदिस्त गटारे 
पुणे-मुंबईसारख्या महानगरांच्या धर्तीवर कोरेगाव शहराचा विकास साधायचा, सातारा शहराची शॅडो सिटी म्हणून कोरेगावचा सर्वांगिण विकास करायचा, हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या आमदार महेशदादा शिंदे यांना राज्याचे विकासपुरुष तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मोठी साथ दिली आहे. आमदार महेशदादा शिंदे यांनी सादर केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावांना नगरविकास मंत्रालयाने एका झटक्यात मान्यता देत शहरासाठी थोडे थोडके नव्हे तर १५ कोटी रुपये दिले आहेत. शहरामध्ये मूलभूत सोईसुविधा देत असतानाच, सोशल इंजिनिअरिंगच नव्हे तर सोशल डेव्हलपेंटचा प्रयोग करण्यात आला असून, ब्राम्हण, लिंगायत, कोष्टी आणि जैन समाजाच्या विकासासाठी १ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आझाद चौकात भव्य भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारले जाणार आहे, त्यासाठी ८ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५ कोटी ९० लाख रुपये इतर विकासकामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. एकाच वेळी १५ कोटी रुपयांचा निधी मिळवणारे कोरेगाव नगरपंचायत एकमेव ठरली आहे. नगरपंचायतीत सत्तांतर होण्यापूर्वी आणि सत्तांतर झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मिळवणारी कोरेगाव नगरपंचायत ही राज्यातील एकमेव नगरपंचायत ठरली आहे. 
नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विकासकामांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक ऍड. शशिकांत क्षीरसागर, साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, सागर वीरकर, राहूल र. बर्गे, राजेंद्र वैराट, परशुराम बर्गे, नगरसेविका सौ. स्नेहल आवटे, सौ. वनमाला बर्गे, सौ. संगीता ओसवाल, सौ. शीतल बर्गे यांनी विकासकामांबाबतची सविस्तर माहिती दिली. कोरेगावकरांनी ज्या विश्‍वासाने नगरपंचायतीची सत्ता सोपविली, त्याच विश्‍वासाने आमदार महेशदादा शिंदे यांनी विकासकामे मंजूर करुन आणली आहेत. नजिकच्या काळात कोरेगाव शहर हे अग्रगण्य शहरांमध्ये समाविष्ठ झालेले दिसेल, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 
पुणे-मुंबई शहरानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा आमदार महेशदादा शिंदे यांनी कोरेगाव शहरातील रस्ते ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय किती योग्य आणि भविष्यकाळाचा वेध घेणारा होता, हे आता रस्ते तयार झाल्यावर दिसून येत आहे. डांबरीकरणाचे रस्ते, त्यांचा दर्जा आणि ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरणाचे रस्ते यातील फरक सुज्ञ नागरिकाला लगेच ओळखता येत आहे. नगरपंचायत निवडणुकीपूर्वी आमदार महेशदादा शिंदे यांनी शहरवासियांना विकासाबाबत महत्वाचा शब्द दिला होता, तो त्यांनी केवळ शंभर दिवसात पूर्ण करुन दाखविला आहे. त्यांनी कोरेगावचे रुपडेच पालटून टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. करतो, पाहतो आणि प्रस्ताव द्या, आदी शब्द हे आमदार महेशदादा शिंदे यांच्या शब्दकोषातच नाहीत, ते थेट विकासकामे मंजूर करुन आणतात, मगच त्याची माहिती देतात,  त्यांना विनाकारण गवगवा करण्याची सवय नाही, त्यामुळे अवघ्या वर्षभरात कोरेगावकरांना विकासकामांबाबतचे कोटींचे आकडे पहिल्यांदाच प्रत्यक्षात पहावयास मिळाले आहेत. आजच्या दिवशी आम्ही एवढेच सांगू इच्छितो की, कोरेगाव शहर बदलत चालले आहे, अजून ते बदलणार आहे. 
कोरेगाव शहरातील प्रवेशद्वार असलेल्या आझाद चौकात येथील भाजी मंडईचा प्रश्‍न दिर्घकाळ रखडला होता. शहरवासियांना ताजा, स्वच्छ व आरोग्यदायी भाजीपाला मिळाला पाहिजे, मंडई परिसरात कायम स्वच्छता राहिली पाहिजे, या हेतूने आमदार महेशदादा शिंदे यांनी आझाद चौकातील भाजी मंडईव व्यापारी संकुल उभारणीचा विषय अजेंड्यावर घेतला होता. मोठ्या महानगरांमध्ये ज्या पध्दतीने भाजी मंडई, व्यापारी संकुल, अद्ययावत पार्किंग सुविधा, स्वतंत्र व टापटीप असलेले स्वच्छतागृह असे भले मोठे संकुल आता आझाद चौकात आकार घेणार आहे. त्यासाठी तब्बल ८ कोटी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अध्यावत भाजी मंडई व व्यापारी संकुल उभे राहिल्याने नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये मोठी भर पडणार आहे. त्याद्वारे कर्मचारी पगार याचा विषय देखील संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.
आझाद चौकाचे बकाल स्वरुप आता बदलले जाणार असून, तेथील दुर्गंधी कायमची हद्दपार होईल, आझाद चौकातील वाहतुकीचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटेल आणि शहराच्या वैभवात भर पडेल, असा तो प्रकल्प उभा राहणार आहे. 
कोरेगाव शहरात सर्वच समाजबांधव हे गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. सामाजिक सलोखा ठेवणार्‍या या गावातील सर्वधर्मियांच्या विकासाच्या उद्देशाने महत्वाचे प्रस्ताव नगरपंचायतीने सादर केले होते. त्यास अनुसरुन आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून आता ब्राम्हण समाज सांस्कृतिक सभागृहासाठी २५ लाख रुपये, लिंगायत समाज सांस्कृतिक सभागृहासाठी २५ लाख रुपये, कोष्टी समाज सांस्कृतिक सभागृहासाठी २५ लाख रुपये तर सातारा-लातूर महामार्गावरील जैन मंदिर परिसर सुशोभिकरण व परिसरात लादीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये असे एकूण १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शहरामध्ये मूलभूत सोईसुविधा देत असतानाच, सोशल इंजिनिअरिंगच नव्हे तर सोशल डेव्हलपेंटचा प्रयोग करण्यात आला असून, ब्राम्हण, लिंगायत, कोष्टी आणि जैन समाजाच्या विकासासाठी पहिल्यांदाच १ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 
कोरेगाव शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये ट्रिमिक्स रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्याकडील साईट पट्टीवर लादीकरण करण्याचा महत्वाचा विषय प्रलंबित होता. त्यामुळे रस्त्यावरुन वाहतूक करताना, प्रवास करताना अडचणी होत्या, ही बाब लक्षात घेऊन ३० लाख रुपये साईट पट्टीवर लादीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहराच्या दक्षिण भागात उपजिल्हा रुग्णालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या पिछाडीस असलेल्या कालेकर कॉलनीचे स्वरुप देखील बदलले जात आहे. एक उपनगर म्हणून या परिसराचा विकास होत असून, या कॉलनीतील अंतर्ग रस्ते ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारे करण्यासाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कालेकर कॉलनीचा रस्त्याचा महत्वाचा विषय संपुष्टात येणार आहे. 
नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत  निधी वितरीत करण्याच्या अनुषंगाने ५ कोटी रुपये कोरेगाव शहरातील विविध प्रभागातील विकासकामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून ही विकासकामे रखडली होती, नागरिकांना वाटत होते की, ही कामे होऊच शकणार नाहीत, मात्र आमदार महेशदादा शिंदे यांनी ती एका झटक्यात करुन दाखविली आहेत. प्रभाग क्र. १ मध्ये डॉ. भालेराव हॉस्टिपल जवळ नवीन सार्वजनिक शौचालय उभारले जाणार असून, त्यासाठी २० लाख रुपये, कोल्हाटी समाजवस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी ४५ लाख रुपये, प्रभाग क्र. २ मध्ये अंतर्गत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी ४० लाख रुपये, प्रभाग क्र. ३ मध्ये गणेश मंदिर शिवाजीनगर येथे अंतर्गत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी २५ लाख रुपये,  सज्जनपुरामध्ये जयभवानी हॉटेल ते जगदाळे यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी ३५ लाख रुपये, प्रभाग क्र. ५ मध्ये संभाजीनगर अंतर्गत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी २० लाख रुपये, प्रभाग क्र. ६ मध्ये आर. एम. देसाई पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अंतर्गत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी ४० लाख रुपये,  प्रभाग क्र. ७ मध्ये मोहिते वाडा ते मेजर शिर्के घर दोन्ही बाजूस पेव्हर्स बसविण्यासह सुशोभिकरणासाठी १० लाख रुपये, भैरवनाथ मंदिरासमोर सार्वजनिक स्वच्छता गृह बांधण्यासाठी १० लाख रुपये, भंडलकर घर ते मुल्ला घर ररस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, प्रभाग क्र. ९ मध्ये बेताळगल्ली टेक येथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यासाठी २५ लाख रुपये, प्रभाग क्र. ११ मध्ये कळकाई विभागात बागवान घर ते संतोष शेळके यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी ३० लाख रुपये, प्रभाग क्र. १२ मध्ये श्रीनाथ नगर येथे रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी ४० लाख रुपये, श्रीनाथ नगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १० लाख रुपये, प्रभाग क्र. १२ मध्ये माहेश्‍वर भवनसमोर सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १० लाख रुपये, प्रभाग क्र. १३ मध्ये शहा यांचे घर ते पाटोळे यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, काळुबाई मंदिर ते लवंगारे घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी १५ लाख रुपये, महावीरनगरमध्ये अंतर्गत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी १० लाख रुपये, बाबर मोटर्स ते सतीश माने यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करण्यासाठी  १५ लाख रुपये, हॉटेल गुलमोहोर ते कमाने यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, प्रभाग क्र. १४ मध्ये गोसावी वस्ती व उमाजी नाईक नगरमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी २५ लाख रुपये तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये असे एकूण ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 
एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातून कोरेगाव शहरासाठी दरमहा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणणारे आमदार महेशदादा शिंदे हे एकमेव आमदार ठरले आहेत.चौकट : कर्मचारी पगाराचा प्रश्न संपुष्टात येणार : विजया घाडगे आझाद चौकामध्ये भव्य व्यापारी संकुल भाजी मंडई उभी राहत असून त्याद्वारे नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होणार आहे. व्यापारी गाळे व भाजी मंडईतील कट्टे भाडेतत्त्वावर देताना मोठ्या प्रमाणावर अनामत रक्कम व भाड्याची रक्कम नगरपंचायतीला मिळणार आहे. त्याद्वारे नगरपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणारच आहे. त्याचबरोबर कर्मचारी पगाराचा प्रश्नदेखील संपुष्टात येणार आहे, अशी माहिती मुख्य अधिकारी विजया घाडगे यांनी दिली.चौकट : नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच दमदार आमदार यांच्या माध्यमातून दमदार विकासकामे :  राजाभाऊ बर्गे 
आमदार महेश दादा शिंदे यांनी कोरेगाव शहराचे पालकत्व स्वीकारले असून त्यांनी दमदार आमदार म्हणून काम करून दाखवत दमदार निधी कोरेगाव शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे. नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळवण्याचे भाग्य केवळ आमदार महेश दादा शिंदे यांच्या रूपाने कोरेगावकरांना मिळाले आहे.विकासकामांसाठी आज मिळालेले १५ कोटी रुपये ही ही सुरुवात आहे, आता दरमहा विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे. एकूणच कोरेगाव शहराचा दमदारपणे विकास केवळ दमदार आमदार महेशदादा शिंदे हेच करू शकतात, असा ठाम विश्वास नगर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.