जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते डॉ अंबादास कदम यांना पुरस्कार प्रदान.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावच्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर अंबादास कदम यांनी 22 वर्ष स्त्री रोग तज्ञ म्हणून अहोरात्र सेवा दिली. या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली वेळी-अवेळी येणाऱ्या सर्व रुग्णांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता योग्य अशी उपचार पद्धती देऊन त्यांनी आपल्या हॉस्पिटलचा नावलौकीक कायम ठेवला तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांसाठीअनेक विविध उपक्रम राबविले तसेच गरीब व होतकरू महिलांसाठी डोहाळे जेवण, ओटी भरण कार्यक्रम, हळदी कुंकू कार्यक्रम, यासारखे अनेक उपक्रम राबवून या ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटलचा त्यांनी नावलौकिक साजेसा ठेवला. तसेच पुसेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आपला जम बसवून एक आदर्श जनतेसमोर तसेच रुग्णासमोर ठेवला आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी पुसेगाव या ग्रामीण भागांमध्ये आपले भक्कम व्यक्तिमत्व तयार केले. आणि याच कार्याच्या अनुषंगाची दखल घेत, डॉक्टर अंबादास कदम यांना मुंबई येथे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू श्री सुनील गावस्कर यांच्या हस्ते ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून" टाईम सायबर मीडिया" तर्फे पुरस्कार प्रदान करून राष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव सुवर्ण नगरीचे नाव उज्वल करणाऱ्या संजीवनी हॉस्पिटल संस्थापक, संचालक, डॉक्टर अंबादास कदम यांचे राजकीय शैक्षणिक सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment