कोरेगावचे सुपुत्र मुन्ना भाई काझी यांचा उत्तर भारत दौरा यशस्वी.

कोरेगावचे सुपुत्र मुन्ना भाई काझी यांचा उत्तर भारत दौरा यशस्वी 


 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम


सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते तसेच  प्रिय मित्र फिरोज उर्फ मुन्नाभाई काझी यांचा उत्तर भारत दौरा करुन नुकतेच त्यांचे कोरेगाव येथे आगमन झाले.त्यावेळी कोरेगाव मुस्लिम समाज एकत्र येऊन त्यांचे मोठे स्वागत केले. मुन्ना भाई काझी हे 25 मे पासून आपल्या स्वतःच्या मोटरसायकल दुचाकी  ने अजमेर, अमृतसर , श्रीनगर काश्मीर , पहेलगाम, डेल लेक, सोनमार्ग, गुलमर्ग , कारगिल मार्गे लेह लडाख पूर्ण , खरदुन्गला टॉप ,नकीला टॉप  , बारालाचा टॉप , तंगलंगला टॉप , लाचुंगला टॉप , पेंनगोक लेक , नुब्रावेली , हुंडर, डबल्ल हम्प केमल (उंट ), भारतातील शेवटचे गाव डीक्सिट हे स्नो फोल , बर्फाच्या बर्फ असे सर्व निसर्गमय ठिकाण पाहून सरचूमार्गे ,पांग ,येथून अटल टनेल मार्गे  मनाली शहर तसेच स्पिटीवेल्ली मार्गे ,कुल्लू सिमला मार्गे ,उत्तराखंड येथील थंड हवेचे ठिकाण डेहराडून, मसुरी , हरिद्वार बद्रीनाथ केदारनाथ करून परत आपल्या मायभूमीत 14 जून ला कोरेगावला सुरक्षित पोहचले ,यांचा सुरक्षित प्रवास झाल्या बद्दल कोरेगावं मुस्लिम समाजातील आरिफ शेख , पत्रकार अज्जू मुल्ला , शब्बीरभाई सय्यद , सलमान काझी  समीर हकीम , नुरु भाई पटवेकर अशा अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना  हार व पेढे देऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.