अग्नीपथ योजनेच्या नावाखाली तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा : आरपीआय ए कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी.
, अग्नीपथ योजनेच्या नावाखाली तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा : आरपीआय ए कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
अग्नीपथ योजनेमार्फत कंत्राटी सैनिक आणि समाजाचे लष्करी करण करण्याचा अत्यंत घातक डाव तसेच तरुणाच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात हुंकार आंदोलन जिल्हा अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचे निवेदन कोरेगाव तालुका आरपीआय( A ) तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी कोरेगाव तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अग्नीपथ योजनेमार्फत कंत्राटी सैनिक आणि समाजाची लष्करी करण करण्याचा अत्यंत घातक डाव सरकारने रचला आहे. हा एक नवा घातक जुमला असून दहावी ते बारावी मधील तरुणांना कंत्राटी पद्धतीने सैन्यात चार वर्ष सरासरी महिना तीस हजार रुपये पगार अग्निविर म्हणून नोकरी देण्यात येईल. यातील 75 टक्के युवक चार वर्षांनी विना निवृत्ती वेतन निवृत्ती केले जातील सैन्यदलात अत्यल्प पगारावर सैनिक घेण्याचा हा डाव आहे. तसेच गरीब युवकांनी उच्च शिक्षणाकडे न जाता अल्प पगारावर जीव धोक्यात घालावा आणि नंतर बेकारी भोगावी असे नियोजन आहे. याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.अग्निपथ योजनेत तरुणांना आकर्षित करण्यासाठी अग्निविर असे नाव देण्यात आले. विशेषतः हा या योजनेचे लाभार्थी नोकऱ्या घेणारे तरुण हे ब्राह्मण व उच्चवर्णीय असणार नाहीत हे उघड आहे. तरुणांचे मेंदू लष्करात तेथील हिंदुत्ववादी अधिकाऱ्यांच्या मदतीने धुऊन काढता येतील ;तरुणांना विज्ञानवादी न बनवता त्यांची सर्जनशीलता मारून टाकून त्यांचे मेंदू लष्करी करण्याचा हा भयानक डाव देशाचा भविष्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे.लष्कर म्हणजे देशसेवा हे समीकरण घातक आहे. मेंदूचे लष्करी करण झालेला समाज हा प्रबोधनापासून दूर जातो, मोदी हे देशात विविध क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यात पूर्ण अपयशी ठरल्याने त्यांनी हा नवा दुहेरी कुटील डाव रचला आहे.अग्नीपथ योजनेतील शंभर टक्के जागा या उच्चवर्णीय तरुणासाठी राखीव ठेवून पहाव्यात किती भरती होते ते! आणि देशासाठी बलिदान करायला करिअर सोडून किती तरुण येतात ते!शक्य होत नाही म्हणूनच तरुणांच्या भविष्याची खेळणाऱ्या या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या सर्वस्वी परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment