कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील जलसिंचन योजनेच्या जलवाहिनी ला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया.

कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील जलसिंचन योजनेच्या जलवाहिनी ला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला


कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वांगना उपसा जलसिंचन योजनेच्या जल वाहिनीला काही  ठिकाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना दुसरीकडे पाणी वाहून जात आहे परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत या योजनेच्या  जलवाहिनीची पूर्ण चौकशी व तपासणी करून  शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी वांगणा उपसा जलसिंचन योजना बचाव कृती समितीचे प्रवर्तक  हनुमंतराव दादा जगदाळे यांनी केली आहे.वांगणा उपसा जलसिंचन योजना जलसंपदा विभागाकडून याकडे हेतू पुरस्पर  दुर्लक्ष करत असल्याने  त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना  बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.  या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या   पाइप कमी दर्जाच्या असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.संबंधीत ठिकाणी  शेतकरीचं  जलवाहिनी फोडतात असा आरोप करून ठेकेदाराला सुरक्षित करण्याचे काम जलसंपदा विभाग करत आहे.कमी दर्जाच्या पाईप वापरण्यात आल्याने त्या सातत्याने जागोजागी फुटत आहेत सध्या पावसाने ओढ दिली असून उन्हाचा कडाका वाढला आहे. शेतकऱ्यांना उद्योगांना पाणी देताना नाकीनऊ येत आहेत अशा मात्र अण्णा ऊसातील सिंचन योजनेच्या अभियंते व कर्मचारी वर्ग सर्वाना सांगत असून स्वतःची जबाबदारी झटकून आनंदात आहेत त्यांना शेतकरी आणि शेतीच्या पाण्याविषयी काहीएक देणेघेणे नसल्याचे सांगत त्यांनी या योजनेचे  तात्काळ विशेष ऑडिट करण्याची मागणी केली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.