बंडखोर पळपुट्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; त्यांची त्यांना जागा दाखवून देऊ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे.

बंडखोर पळपुट्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे ; त्यांची त्यांना जागा दाखवून देऊ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला


महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी जो बंडखोरपणा चालू केला असून हिंदुत्वाच्या नावाखाली कळवळा आणून शिवसेनेची फारकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे शिवसेना व हिंदुत्व हे कधी वेगळे होऊ शकत नाही हिंदुत्वाच्या नावावर फारकत घेणे हा बहाना आहे, येत्या काळात शिवसेना सोडून निवडणुकीस उभे राहून दाखवावे व निवडून यावे व समर्थकांनी सुद्धा यांना निवडून आणावे ; शिवसेना त्यांची त्यांना जागा दाखवून देईल!असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांनी कोरेगाव येथे दिला आहे.
.   कोरेगाव येथील जुना एसटी स्टँड परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने सध्याच्या राजकीय परिस्थिती अनुषंगाने बंडखोर आमदारा विरूद्ध  मोर्चा काढण्यात आला होता त्याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले" महाविकास आघाडीत अन्याय होत आहे. महा विकास आघाडीचे मुख्यमंत्रीच  उद्धव साहेब ठाकरे असताना अन्याय कसा होत आहे आणि बाकीचा विषय येतोच कुठे? हा या बंडखोर आमदारांचा स्वार्थ आहे यांना हिंदुत्वाचा पुळका नसून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना हा आघाडीत अन्याय होतोय म्हणून फारकत घेण्याचा हा त्यांचा स्वार्थी डाव आहे. आणि हा त्यांचा चाललेला प्रयत्न शिवसेना खपवून घेणार नाही.
. विषय राहतो स्थानिक विषयाचा कोरेगाव शहरामध्ये आमदार महेश शिंदे साहेबांनी या प्रभागासाठी एवढे पैसे आणले, त्या प्रभागासाठी एवढे पैसे आणले, भाजी मंडई साठी कोट्यावधी रुपये आणले, कोट्यावधी रुपयांची महेश शिंदे साहेब बरोबर समर्थकांची होर्डिंग लागली. हा पैसा आला कोठून असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. महाविकासआघाडी मुळेच हे पैसे मिळाले ना आणि पैसे मिळत नाही म्हणून उलट बोंबा मारत बसायचे सद्यपरिस्थिती ची कोरेगाव शहरातली ची बोलकी होर्डिंग सांगताहेत आणि महाविकास आघाडीत अन्याय होतोय म्हणून खोटा आरोप करायचा म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा म्हणायचं
.  उद्धव साहेबांनी भाबडेपणाने यांना उमेदवारी देऊन आणि शिव सैनिकांनी जीवाचे रान करून आपल्या रक्ताचे पाणी करून निवडून आणले. या आमदारांनी येत्या  निवडणुकीत शिवसेना सोडून राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे व त्यांच्या समर्थकानी देखील निवडून आणावे असे जाहीर आवाहन दिनेश बर्गे यांनी केले. या मोर्चामध्ये विविध कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले या मोर्चामध्ये शहर प्रमुख अक्षय बर्गे, तालुकाप्रमुख सचिन दत्तात्रय झांजुर्णे, शाहीर जरंडे, आशिष जोशी, दिलीप जाधव, राहुल कळसे, धनंजय भास्कर राशिनकर, विनोद शेडगे,भरत भोज, राजू जाधव, रविकांत बर्गे, धैर्यशील शिर्के, निखिल कदम, गणेश भोसले,संदीप कळसे, सागर शिंदे इत्यादी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिंदाबाद, उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात येत होत्या घोषणाबाजीने हा परिसर सारा दुमदुमून गेला होता.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.