कोरेगाव तालुक्यातील भोसे गावामध्ये विर जवान विपुल इंगवले यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

कोरेगाव तालुक्यातील भोसे गावामध्ये विर जवान विपुल इंगवले यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला 


साताऱ्यातील भोसे गावामध्ये वीर जवान विपुल इंगवले यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजता भोसे येथे त्यांच्या गावी आणण्यात आले.त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.वीर जवान सियाचीन मध्ये बर्फाच्छादित प्रदेशामध्ये कार्यरत असताना होम दनशामुळे गंभीर परिणाम होऊन मार्च 2021 पासून उपचार घेत होते.वय वर्ष 26 असताना सिंगल रेजिमेंट मध्ये नियुक्ती होती . 24 जुने 2019 रोजी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक लहान मुलगी आहे .ते भोसे येथील महाविद्यालयात असताना सर्वात बलदंड शरीर सृष्टी पाहून त्यांना एन.सी.सी मध्ये घेण्यात आले.अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक व प्रचंड जिद्द त्यांच्यात होती .ज्या खेळात सहभाग घेण्यास सांगितले त्या खेळात प्रावीण्य मिळवत होते .त्यांच्यामध्ये जलतरण , कबड्डी ,बॉक्सिंग  , गोलाफेक या मध्ये ऑलराऊंडर असल्याने सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनले होते.एन .सी. मध्ये सर्वोत्तम मानली जाणारी R.D परेड दिल्ली यासाठी त्यांची निवड झाली होती . महाराष्ट्राच्या टीममध्ये त्यांची निवड झाली .व दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रपतींच्या समोर संचलन केले होते.आर्मी मध्ये ही अनेक मेडल मिळवली होती .व शेवट पर्यंत लढत राहिले .त्यांची पत्नी bsc झालेली असून अत्यंत निर्मळ व मनमिळावू आहे .व मुलगी 1 वर्षांची आहे .त्यांनी आपली पदवी ज्या विद्या लयातून पूर्ण केली त्या डी पी भोसले महाविद्यालय कोरेगाव या महाविद्यालयाला  पहिल्या पगारातून 15000 रुपये देणगी दिली होती . असे आमचे भोसे गावाचे वीर जवान विपुल इंगवले यांचे निधन रविवार दिनांक 5 जून रोजी झाले त्यांच्या अंत्यविधीला खासदार श्रीनिवास पाटील तसेच आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे कोरेगाव येथील प्रांत अधिकारी ज्योती ताई पाटील नायब तहसीलदार सौ शिंदे मॅडम पंचायत समितीचे बि. डी. ओ क्रांती बोराटे मॅडम व सर्व पोलीस प्रशासन उपस्थित होते.त्यांच्या जाण्याने कोरेगाव येथील भोसे गावामध्ये शोककळा पसरली आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.