ह्युमन रेट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्री बबनराव मदने उर्फ नाना यांनी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेजला दिली सदिच्छा भेट.

ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष मा. श्री बबनराव मदने उर्फ नाना यांनी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेजला दिली सदिच्छा भेट. 
 सातारा 24 तास न्यूज. प्रतिनिधी. राजेंद्र मदने. 
 मौजे पेठ वडगाव तासगाव रोड ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र रा.माने यांना  ह्युमन  राइट्स फाउंडेशन ऑफ सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री. बबनराव मदने उर्फ नाना यांनी दिली सदिच्छा भेट. भेटीदरम्यान संस्थापक अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर विद्यानिकेतन मध्ये फिरून पाहणी केली असता त्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता त्यांना लागणाऱ्या सुविधा त्यामधील सुसज्ज वस्तीग्रह. स्वच्छ व नीटनेटके भोजन ग्रह. वर्ग शैक्षणिक साधन. संगणक कक्ष. प्रयोगशाळा ग्रंथालय. क्रीडा साधन. अटल टिंकरिंग लॅब व इतर भौतिक सुविधा हे सर्व पाहून संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र माने साहेब.विद्यानिकेतन शिक्षक वर्ग या सर्वांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी ते म्हणाले. आज विद्या निकेतन आणि संस्थापक अध्यक्ष माने साहेब यांचे व संस्थेचे भरभरून कौतुक केले तरी ते कमीच आहे. असे यावेळी मदने साहेब यांनी म्हटले. सद्यस्थिती पाहता आज इयत्ता 10 वी रिझल्ट 100 % टक्के लागला हे देखील यावेळी मला पाहायला मिळाले असल्याचे सांगत संस्थापक अध्यक्ष शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष यांनी श्री बबनराव मदने उर्फ नाना यांना पुष्प बुके देऊन स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.