शहीद जवान सुरज शेळके अमर रहे या घोषणेने अखेरचा निरोप.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
खटाव ता. खटाव येथील शहीद जवान सुरज शेळके (वय 23) यांचे लडाख मध्ये कर्तव्य बजावत असताना गुरुवार दिनांक 23 रोजी शहीद झाल्याची बातमी खटाव मध्ये समजली आणि सर्वांचेच लक्ष शहीद जवान यांच्या पार्थिव येण्याकडे लागेल .शनिवारी रात्री दहा वाजता त्यांचे पार्थिव खटाव मध्ये आणण्यात आले आणि रात्री उशिरा त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
सर्वप्रथम सोमनाथ नगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर पार्थिव शरीर आणण्यात आले .यावेळी सुरज यांच्या आई सुवर्णा शेळके व लहान भाऊ गणेश शेळके यांनी फोडलेल्या हंबरडा मुळे तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. सर्वजण या जवानाच्या अकाली जाण्याने हेलावून गेले होते. यावेळी सुरज शेळके अमर रहे ,भारत माता की जय ,जबतक सुरज चांद रहेगा सुरज तुम्हारा नाम रहेगा, या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.सोमनाथ नगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात शोकाकुल वातावरणात यांच्या वर शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले .
तत्पूर्वी जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवाचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या खटाव मधील ग्रामस्थानी उस्फूर्तपणे खटाव बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली .तर शहीद जवान यांच्या मिरवणूक मार्गावर रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करत त्यांच्या अंतिम प्रवासाला साश्रू नयनाने निरोप दिला.त्यांच्या पार्थिवाला सुरज यांचे छोटे बंधू गणेश शेळके यांनी मुखाग्नी दिला .गावात मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या अत्यं यात्रेत महिला ,तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कार्यालय समोर यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी पुष्प चक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती तर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहीद सुरज जवान यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सुरज शेळके 2018 मध्ये सैन्यदलात भरती झाले होते .अतिशय शांत ,संयमी तसेच समजूतदार, परिस्थितीची जाण असणारा अशी त्यांची मित्र परिवार व समाजात ओळख होती .सुरज शेळके हे भारतीय सैन्य दलात सध्या लडाख येते 141फिल्ड रेजिमेंट मध्ये लान्स नाईक या पदावर सेवा बजावत होते. गुरुवार दिनांक 23 रोजी त्यांना सेवा बजावत असताना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला व प्रकृती अस्वास्थ वाटू लागली त्यामुळे त्यांना त्वरित त्यांच्या जवळच्या आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी त्यांचे छोटे बंधू गणेश यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आली .सुरज यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांची आई सुवर्णा या मोलमजुरी करतात वडील मिठाईच्या दुकानात काम करतात .अशा हालाखीच्या परिस्थितीत या कुटुंबातून अवघ्या चार वर्षांपूर्वी भरती झालेल्या सुरज यांच्या सैन्य दलातील भरती मुळे कुटुंबाचे बसलेली घडी नियतीने विस्कटल्या मुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment