मोटारसायकल व जिवंत घोरपडी सह एक जण वनविभागाच्या जाळ्यात: वडूज वनविभागाची मोठी कारवाई.
सातारा 24 तास न्यूज. अकबर भालदार.
औंध. घोरपड पकडल्याची मिळालेल्या गुप्त माहितीनुसार श्रीम. एस.एन.फुंदे वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने वडूज वनपरिक्षेत्रातील मौजे नांदोशी तालुका खटाव येथे जिवंत घोरपड अवैधरीत्या पकडून मोटारसायकल क्रमांक एम.एच. 11 सी.यू. 86 94 वरून घरी घेऊन जात असताना मौजे नांदोशी गावच्या हद्दीत घाटमाथा परिसरातील घळी नावाचे गायरान क्षेत्रात जागेवर जाऊन आरोपी धनाजी मारुती खताळ वय वर्षे 45 रा. नांदोशी ता.खटाव याला मोटारसायकल व जिवंत घोरपड ताब्यात घेऊन वन्यजीव ( संरक्षण) अधिनियम 1972 मधील अनुसूची-1 भाग मधील सरक्षित प्राणी असलेने वडूज वनविभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 43, 44, 48 अ, 50, 51 अन्व्ये वनरक्षक पुसेसावळी यांच्याकडील वन गुन्हा क्रमांक WL-06/2022 व रेंज गुन्हा क्रमांक WL-03/2022 दि.06/06/2022 नोंद करून आरोपीला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच जिवंत घोरपड एक वैद्यकीय तपासणी मा. पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग 1 औंध यांच्याकडून करून घेतली असता. सदरील जिवंत घोरपड वैद्यकीयदृष्ट्या सुस्थितीत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. सदरची कारवाई ही श्रीम. एस.एन.फुंदे वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज. श्री.रामदास घावटे वनपाल वडूज. श्री.बिरू जावीर वनरक्षक पुसेसावळी श्री.अकबर भालदार. श्री.संपत जगताप यांनी केली सदर कारवाई ही मा. श्री.एम.एन.मोहिते साहेब उपवनसंरक्षक सो सातारा. व श्रीम. आर.ए.व्होरकाटे सहाय्यक वनसंरक्षक रोहयो वन्यजीव सो सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरचा पुढील तपास हा श्री.रामदास घावटे वनपाल वडूज करीत आहे.
Comments
Post a Comment