निढळ येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
निढळ ता .खटाव येथे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. अशा या महापुरुषाच्या स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे 6 जून म्हणजेच शिव राज्याभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस आहे. हाच दिवस शिवस्वराज्य दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. व हा दिवस आपल्या सर्वांसाठी सुवर्ण दिवस आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचे स्वाभिमान आहेत.महाराजांमुळेच आज मराठी माणूस जगात आज ताठ मानेने उभा आहे असे. प्रतिपादन निढळ येथील शिवभक्तांनी केले.
निढळ येथे मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला .सकाळी ध्वजारोहण करणेत आले. या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, विद्यमान सदस्य, प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment