सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांची अपप्रवृत्तींना इशारा.

सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांची अपप्रवृत्तींना इशारा.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

 साताऱ्यातील एबीपी माझा चे पत्रकार राहुल तपासे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी प्रसिद्धी
 माध्यमांसमोर केले आहे
 एबीपी माझा चे पत्रकार राहुल तपासे हे 30 मे रोजी महामार्गावरून जात असताना समोरील गाडी मध्ये दारू पीत असलेल्या व्यक्तीकडे बघितल्याचा रागातून त्या गाडीतील तीन व्यक्तींनी संगममत करून त्यांची चार चाकी गाडी राहुल तपासे यांच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी या दोघांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी करीत त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याशी संपर्क साधून मागणी केली होती त्यानंतर या या प्रकरणातील एका आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे सातारा जिल्ह्यातील कुठल्याही पत्रकाराला यापुढे केसाला जरी धक्का लागला तरी सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्र घेऊन त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभे करून त्याला कठोर शासन देण्यापर्यंत साताऱ्यातील पत्रकार प्रयत्न करीत राहतील त्यामुळे सातारच्या पत्रकारांच्या केसाला देखील मी धक्का लावून देणार नाही असे मत मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष हरिष पाटणे यांनी बोलताना व्यक्त केले आहे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.