डॉ. अंबादास कदम यांनी गुडघेदुखीची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचारा बाबत दिली माहिती.


डॉ. अंबादास कदम यांनी गुडघेदुखीची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि उपचारा बाबत दिली माहिती.
पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 
 बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे गुडघेदुखीने अनेक जण त्रस्त आहेत.
पूर्वी साठीनंतर होणारे गुडघ्याचे आजार आता चाळीशित होत आहे.गुडघेदुखी हा arthritis (संधिवात) चा एक प्रकार आहे. त्यामध्ये गुडघ्याच्या संध्यातील कार्टीलेज खूपच कमजोर होत असतात. गुडघ्यांच्या आर्थायटीस मध्ये गुडघ्याचे ठिकाणी सूज येते आणि अतिशय वेदना होत असतात.
 *गुडघेदुखी ची कारणे*
गुडघेदुखीचा त्रास प्रामुख्याने उतारवयात वयाच्या पन्नाशीनंतर होत असतो. कारण या वयात सांध्यातील कार्टीलेजची झीज अधिक प्रमाणात झालेली असते. या वयात हळूहळू हाडे ठिसूळ व्हायला लागतात. या व्यतिरिक्त खालील कारणाने ही गुडघेदुखी होऊ शकते-
१. गुडघ्याला दुखापत होणे
२. लठ्ठपणामुळे शरीराच्या अतिरिक्त वजनाचा भार गुडघ्यावर आल्याने
३. बैठी जीवनशैली 
४.व्यायामाचा किंवा शारीरिक श्रमाचा अभाव 
५.तसेच रक्तात यूरिक ॲसिड प्रमाण जास्त झाल्यास युरिक ऍसिडचे स्फटिक गुडघ्यात जमा होतात आणि गुडघेदुखी होते
६. त्याचप्रमाणे आमवात यामुळेही गुडघेदुखी होऊ शकते.
 *गुडघे दुखी ची लक्षणे*
१.गुडघ्यामध्ये अतिशय वेदना होणे 
२.गुडघ्यांचे सांधे आखडणे
३. गुडघ्यावर सूज येणे 
४.त्यांची हालचाल केल्यास किंवा चालल्यास गुडघे जास्त दुखणे.
५. उठताना बसताना गुडघ्यामध्ये वेदना होणे 
*गुडघेदुखी चे निदान*
       संधीवातामुळे प्रामुख्याने गुडघे दुखतात. याच प्रमाणे आमवात, गाऊटचा त्रास असल्याने गुडघेदुखी होते. त्यासाठी रुग्णाची लक्षणे, शारीरिक तपासणी करून आपले डॉक्टर गुडघेदुखीचे निदान करतील. तसेच निदान अधिक स्पष्ट होण्यासाठी एक्सरे, सिटीस्कॅन किंवा एम.आर.आय या तपासण्या केल्या जातात. याशिवाय रक्त तपासणी पण करायला हवी.
*गुडघेदुखी वरील उपाय*
 कोणत्या कारणांमुळे गुडघेदुखी होत आहे त्यानुसार उपचार ठरतात.
गुडघे दुखीवर आपले डॉक्टर काही वेदनाशामक औषध गोळ्या देतील तसेच काहीवेळा गुडघ्याच्या ठिकाणी लावण्यासाठी क्रीम दिली जाते. त्यामुळे गुडघ्यातील वेदना व सूज कमी होण्यास मदत होते.
काही व्यायाम उपचाराने ही गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
गुडघेदुखीवर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे कारण सुरुवातीला साधारण वाटणारी गुडघेदुखी ही केवळ दुर्लक्ष केल्यामुळे किंवा तात्पुरते वेदनाशामक औषध (पेनकिलर) घेत मूळ कारणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील गुडघ्याचा अर्थर्याटीस होऊ शकतो अशा वेळी मात्र सांधे बदलण्याचे ऑपरेशन करावे लागू शकते.
 *गुडघे दुखी वरील शस्त्रक्रिया*
 गुडघ्याच्या सांध्यांचा म्हणजे अर्थराइटिस मध्ये शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन कडे पाहिले जाते.
 यामध्ये अर्थरोस्कोपी, ज्यामध्ये दुर्बिणीने गुडघ्याची तपासणी करून योग्य तो उपचार करण्यात येतो. ग्राफ्टिंग, यामध्ये गुडघ्यावर असलेल्या कास्थीची झीज भरून काढण्यासाठी गुडघ्याच्या मागील भागातील कास्थी काढून योग्य ठिकाणी ग्राफ्टिंग केले जाते किंवा मग सांधे-बदली यासारखे ऑपरेशन करावे लागते.
 *अर्थरोस्कॉपी*
या मध्ये गुडघ्यात लहान उपकरणे घालून तपासणी केली जाते व हाडाचे तुकडे लागुन त्रास होत असल्यास ते तुकडे काढून टाकले जातात आणि जर गुडघ्या भोवतीच्या मिनिस्कस/ कुर्चा किंवा लिगामेंट/ शिरा खराब झाले असल्यास त्याची दुरुस्ती केली जाते.
*कार्टीलेज ग्राफ्टिंग*
यामध्ये शरीरातील दुसऱ्या भागातून कार्टीलेज घेऊन ते गुडघ्यांच्या हाडा भोवती बसवले जाते.
*नी रिप्लेसमेंट सर्जरी*
 यामध्ये खराब झालेला गुडघा किंवा गुडघ्याचा काही भाग काढून टाकतात आणि त्या ठिकाणी मेटल किंवा प्लास्टिकचा सांधा बसवला जातो. ऑपरेशन नंतर हा कृत्रिम सांधा मूळ गुडघ्याच्या सांध्यासारखे कार्य करतो.
*गुडघे दुखी वर घरगुती उपाय*
 सूज व वेदना कमी करण्यासाठी गुडघ्याच्या सांध्यावर गरम शेक किंवा बर्फाचा शेक दिल्यास आराम मिळतो.
आयुर्वेदिक वेदनाहर तेलाने गुडघ्याला मालिश करावी.
दुधात हळद टाकून घ्यावे. यामुळे सांध्यातील सूज कमी होण्यास मदत होते.
गुडघ्याचा बेल्ट वापरावा 
किंवा डॉक्टरांकडे जाऊन फिजियोथेरेपी व मसाज याचा अवलंब करावा यामुळे मांसपेशी मजबूत व लवचिक होण्यास मदत होते.
*गुडघेदुखी साठी नी-कॅप, काठी, वॉकर याचा वापर कसा करावा* 
नी - कॅप :
गुडघेदुखीच्या रुग्णांमध्ये नी-कॅप वापरून बरेच दुखणे कमी होते. यासाठी योग्य मापाची नी-कॅप वापरावी तसेच जास्त आवळुन घालू नये त्यामुळे वेदना वाढण्याची शक्यता असते. चालताना याचा वापर करावा मात्र झोपण्यापूर्वी काढून ठेवावा.
काठीचा वापर-
गुडघेदुखी च्या बऱ्याच रुग्णांमध्ये काठीचा वापर उपयोगी ठरू शकतो.
अशावेळी काठी ही रुग्णांच्या खूब्याइतकीच उंच आलेली असावी. याशिवाय काटीच्या खाली रबर असला पाहिजे, ज्यामुळे काठी जमिनीवरून विसठणार नाही.
वॉकर:
वॉकरचा वापर हा जेव्हा दोन्ही गुडघे त्रास देत असतील तेव्हा करू शकता. शक्यतो वजनाला हलका असणारा वॉकर वापरावा.
*गुडघेदुखी होऊ नये यासाठी उपाय*
-वजन आटोक्‍यात ठेवा. लठ्ठपणामुळे गुडघ्यावर ताण वाढतो.
- नियमित व्यायाम व योगासने करावीत. आपल्या डॉक्टर कडे जाऊन उपयुक्त व्यायाम व योगासने शिकून घ्या.
-सोबत रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
- लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्या चढण्या- उतरण्याची सवय लावून घ्यावी.
- हाडांची झीज भरून काढण्यासाठी कॅल्शियम युक्त आहार म्हणजे दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, पालेभाज्या,जसे की शेपू ,शेवगा, मेथी त्याचा वापर जरूर करावा.
-सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा मिनिट बसावे,त्यामुळे शरीराला विटामिन-डी मुबलक मिळते. ज्यामुळे कॅल्शिअमचे शोषण होण्यास मदत होते.
-गुडघ्याला मार लागणार नाही याची काळजी घ्यावी.
(या सर्व गुडघेदुखी वरील माहितीनंतर आपणास सविस्तर सल्ल्यासाठी आपण आमच्या दवाखान्यास भेट देऊ शकता. *संजीवनी हॉस्पिटल व सर्जिकल सेंटर* दहिवडी रोड, पुसेगाव याठिकाणी 
*डॉक्टर आनंद आष्टूरे* हे अनुभवी अस्थिरोग तज्ञ उपस्थित आहेत. 
रुग्ण तपासणी ची वेळ-
सकाळी दहा ते एक व सायंकाळी पाच ते आठ असेल.
बाकी अत्यावश्यक उपचारासाठी डॉक्टर 24 तास उपलब्ध असतात असी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
संपर्क 9423032625, 9405056519.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.