ग्लोबल कलर्स अँड पेंट्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने वर्धनगड जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

ग्लोबल कलर्स अँड पेंट्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने वर्धनगड जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सातारा 24 तास न्यूज. मुख्य संपादक. नितीन घोरपडे. 

 ग्लोबल कलर्स अँड पेंट्स लिमिटेड मुंबई यांच्या वतीने वर्धनगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वर्धिनी विद्यालय वर्धनगड या ठिकाणी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला ग्लोबल कलर्स अँड पेंट्स  लिमिटेड मुंबई या कंपनीचे एमडी परवेश जुमानी पंकज पेंट कोल्हापूरचे पंकज तलरेजा विशाल पेंट मार्ट सातारचे विशाल कोळेकर रीजनल सेल्स मॅनेजर किशोर कमगल एरिया सेल्स मॅनेजर योगेश कोरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव शिवसेना खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर महाराष्ट्र रंग कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय घोरपडे केंद्रीय पत्रकार संघ खटाव तालुका उपाध्यक्ष नितीन घोरपडे वर्धनगड सोसायटी चेअरमन नलेश जाधव वर्धनगड सोसायटी संचालक दीपक कोठावळे शिवसेना शाखाप्रमुख वर्धनगड शिवसेना शाखा प्रमुख असलम शिकलगार विलास पवार जिल्हा परिषद केंद्र शाळा मुख्याध्यापक जाधव मॅडम जगदाळे मॅडम मुल्ला सर कुंभार सर फडतरे सर वर्धिनी विद्यालय मुख्याध्यापक भोसले सर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
 यावेळी बोलताना ग्लोबल कलर्स अंड पेंट्स चे एमडी जुमानी सर मुलांनी शिक्षण प्रवाहात कायम राहिले पाहिजे तसेच येणाऱ्या अडचणींचा सामना करत आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे तसेच वेळोवेळी लागणारी मदत देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिली
 उपजिल्हाप्रमुख प्रथम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले ग्लोबल कलर्स अँड पेंट्स यांनी हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय स्तुत्य असा आहे यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेण्याकरता प्रोत्साहन मिळेल तसेच हाi कार्यक्रम राबविल्याबद्दल संजय घोरपडे यांचे देखील त्यांनी मनापासून अभिनंदन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  फडतरे सर यांनी केले

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.