निढळ सोसायटी चेअरमन पदी शशिकांत खूस्पे पाटील यांची निवड.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
निढळ तालुका खटाव येथील सोसायटी निवडणुकीत माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखालील दणदणीत विजय मिळवला या निढळ सोसायटीची नुकतीच चेअरमनपदाची निवडणूक पार पाडण्यात आली. त्यामध्ये शशिकांत खूस्पे पाटील यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी पोपट जाधव यांची निवड करण्यात आली.
निढळ विकास सेवा सोसायटी ही एक आदर्श सोसायटी आहे.या सोसायटी ची प्रशस्त इमारत आहे.तसेच या इमारतीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व ऐ टी एम केंद्र आहे.निढळ सोसायटी मार्फत उत्तम पणे रेशनिंग दुकान चालवण्यात येत आहे. सोसायटीच्या खताच्या दुकानाच्या माध्यमातून उत्तम दर्जाची खते माफक दरात मिळत आहेत अशी माहिती भीमराव माने यांनी दिली.
निवडून आलेल्या सदस्यांचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी व निढळ कातळगेवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment