छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र रा. माने अनेक भूषण पुरस्काराचे ठरले मानकरी.

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र रा. माने अनेक भूषण पुरस्काराचे ठरले मानकरी. 
 सातारा 24 तास न्यूज प्रतिनिधी/मुख्य संपादक 
अकबर भालदार. 
पेठ वडगाव तासगाव रोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र रा. माने साहेब यांनी शुन्यातून जग निर्माण केल्यासारखेच आहे. त्यांनी स्वामी विवेकानंद. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. महात्मा ज्योतिबा फुले. राजश्री शाहू महाराज यांचा विचारांचा आदर्श घेत सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्यू. कॉलेज पेटवडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या नावाने सैनिकी पॅटर्न निवासी व अनिवासी शैक्षणिक संकुल बालवाडी ते इयत्ता दहावी मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यम त्याचबरोबर इयत्ता अकरावी बारावी सायन्स व अकरावी बारावी आर्टस सोबत सह्याद्री करियर ॲकॅडमी मार्फत पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवण्याचा ध्यास घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आधुनिक शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याकरता आधुनिक व पारंपरिक पद्धतीने शिक्षण देण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात विद्यार्थी घडवित असताना विद्यार्थ्यांच्या इच्छा व आकांक्षा विचारात घेऊन शिक्षण देण्याचा व भविष्यकाळात देशाचा सुजान नागरिक घडविण्या करता त्यांना तज्ञ व अनुभवी अध्यापक ज्ञानदानाचे पवित्र कार्य या ठीकणी केले जात आहे. पारंपरिक पद्धतीची गुरु- शिष्यांची विरत जाणारी शैक्षणिक परंपरा येथे जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता त्यांना लागणाऱ्या सुविधा तसेच सुसज्ज वस्तीग्रह. स्वच्छ व नीटनेटके भोजन ग्रह. वर्ग शैक्षणिक साधने. संगणक कक्ष. प्रयोगशाळा. ग्रंथालय. क्रीडा साधन अटल टिंकरिंग लॅब. इतर भौतिक सुविधा त्याचबरोबर क्रीडा प्रशिक्षक वर्गा मार्फत विविध खेळाचे प्रशिक्षण देऊन या विद्यामंदिरातून आदर्श विद्यार्थी बनून स्वतःचे आयुष्य घडवले त्याच बरोबर ह्या वर्षी देखील इयत्ता दहावीचा रिझल्ट 100 % टक्के लागले ने या विद्या निकेतन व ज्यू. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र रा. माने साहेब यांना अनेक सर्वतोपरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.