केंद्र शासनाच्या अग्निपथ योजने विरोधात कोरेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
भारतातील सैन्यदलातील सैन्य प्रक्रियेमुळे मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने बदल करून अग्नि पत योजना लागू केली आहे या योजनेमुळे देशातील लाखो युवकांचे भवितव्य धोक्यात आलेआहे. त्यामुळे देशांमध्ये बिहार ते उत्तर प्रदेशसह बहुतांशी राज्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध युवकांनी आंदोलन करून प्रचंड रोष दर्शवला आहे यास अनुसरून मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अग्निपथ सैन्य भरतीची योजना मागे घेऊन पूर्ववत सैन्यभरती योजना राबवण्याचा निर्णय घेण्यासंबंधी कोरेगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनावेळी बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस मनोहर बर्गे म्हणाले" भारतातील सैन्य दलातील अग्निपथ सैन्य प्रक्रियेमुळे हजारो तरुणांचे भविष्य धोक्यात आले असून चार वर्ष नोकरी केल्यानंतर या तरुणांचे भविष्य काय!तरुणांचे दहावी व बारावी शिक्षण असणार आहे. चार वर्ष नोकरी करून पुढे काय करणार असा प्रश्न तरुणांपुढे आहे.या चुकीच्या धोरण निर्णया विरोधात राहुल गांधी यांच्यासमवेत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या योजनेमुळे जे तरुण भरती होणार आहेत चार वर्षानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचे सुविधा मिळणार नाहीत त्यांनी पुढे काय करायचं हा प्रश्न उपस्थित होणार आहे. दरवर्षी पन्नास हजार सैनिक भरती करण्यात येते. कोरूना मुळे दोन वर्षे केली नाही दीड लाख सैन्यभरती अपेक्षित असताना नवीन योजना काढून युवकांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचे मत मनोहर बर्गे यांनी व्यक्त केले.
यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नाजीम इनामदार यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने अग्निपथ योजना राबवली आहे. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी कोरेगाव तालुका व तमाम सातारा जिल्ह्याचे वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सैन्यांमध्ये तरुणांनी केंद्र सरकारची चार वर्षे नोकरी करायची भरती होताना वय 18 ते 20 वर्षे असणार,तर निवृत्ती नंतर 25 ते 26 वर्ष वय असणार!त्यानंतर त्यांचं भविष्य अंधकारमय असणार आहे. कारण त्याच शासकीय नोकरीतील वय दरम्यानच्या कालावधीत खंड पडणार असल्याने, इतर नोकऱ्या मिळणार नाहीत, यामुळे या अग्निपथ योजनेतील तरुणांचे भविष्य अंधकारमय असणार आहे.अशा चुकीच्या धोरणाच्या मुळे आमच्या शेतकऱ्यांची मुले देश सेवेसाठी धाडसाने छातीची ढाल करण्याची हिम्मत, ताकत धैर्य ठेवून सैन्यामध्ये भरती होतात, आणि ही धैर्य कोणामध्ये आहे तर ते शेतकर्यांच्याच मुलांमध्ये असते ;शेतकरी कुटुंबातील मुलं या क्षेत्रामध्ये जास्त जात असतात त्यासाठी ते अथक परिश्रम घेतात, मेहनत घेतात पाच पाच वर्ष फिजिकल फिटनेस साठी मेहनत घेतात व भरती होतात. त्या शेतकऱ्यांच्या मुलांची आंदोलने चिरडणे, शेतकऱ्यांचे मुलाचे भविष्य अंधकारमय करणे,अशा पद्धतीने चुकीची योजना केंद्र सरकार राबवीत आहे. यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याप्रसंगी शेतकरी काँग्रेस संघटना अध्यक्ष सुनील मांगले, कोरेगाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष सचिन जगताप, उपाध्यक्ष अविनाश फाळके, सदस्य आनंदराव जाधव, जालिंदर भोसले, हमीद भाई पठाण, अमरसिंह बर्गे, जयवंत घोरपडे, सचिन जगदाळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment