कोरेगाव शहरातील प्रभाग १२ व १३ मध्ये पथदिव्यांचा घरगुती वापर ;अनधिकृत पथदिवे हटवा, दिनेश सणस यांची मागणी,

कोरेगाव शहरातील प्रभाग १२ व १३ मध्ये पथदिव्यांचा घरगुती वापर ;अनधिकृत पथदिवे हटवा, दिनेश सणस यांची मागणी,  

[पथदिवे हटवणार नाही, मुख्याधिकाऱ्यांची भूमिका]

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला

कोरेगाव शहरातील राजकीयदृष्ट्या प्रगल्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभागा १२ व १३ मध्ये शेकडो पथदिवे घरगुती कारणाकरिता वापरण्यात येत असून या पथदिव्यांचे लाखो रुपये वीजबिल नगर पंचायत भरत असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस यांनी उघड केले आहे. दिनेश सणस यांनी याबाबत नगर पंचायतिकडुन माहितीच्या आधारे माहिती मागविल्यानंतर शेकडो पथदिवे अनधिकृत असल्याचे नगर पंचायतीने  माहिती दिली असून परंतु हे पथदिवे काढण्याची हिंमत नगर पंचायत दाखवत नसल्याने खळबळ उडाली असून नगर पंचायत प्रशासनावर नक्की कुणाची दहशत,  दबाव आहे याचीही जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव शहराच्या उत्तरेला मूळ  गावापासून बाजूला लक्ष्मीनगर, आझादचौक, जळगावनाका हा मोठा परिसर आहे. पूर्वीपासून कोरेगाव ग्रामपंचायत तसेच सध्या नगर पंचायतिची सत्ता ठरविणारा परिसर म्हणूनही या परिसराची ओळख आहे. कोरेगाव ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती पदेही भूषवणारी व्यक्तिमत्व या ठिकाणी घडले आहेत. पूर्वी कोरेगाव ग्रामपंचायतिचा वार्ड क्र.२ म्हणून या परिसराची ओळख होती. परंतु २०१६ ला नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या परिसराचे प्रभाग रचनेत या भागाचे पाच प्रभाग झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस यांना प्रभाग १२ व १३ मध्ये पथदिव्यांचा वापर घरगुती कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले. या पथदिव्यांचा लाभ गोर गरीब कुटूंब नाही तर चक्क नगर पंचायतीच्या सत्तेत सहभागी असणारे राजकीय कार्यकर्ते व त्यांचे बगलबच्चे  नगर पंचायतीच्या पथदिव्यांचा मोफत लाभ घेत असून याचे लाखो रुपये विजबील नगर पंचायत भरत आहे हे सामाजिक कार्यकर्ते  दिनेश सणस याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत अनधिकृत पथदिवे कुणाचे व किती आहेत याबाबत माहिती मागविल्यानंतर शेकडो  पथदिवे अनाधिकृत असल्याची माहिती कोरेगाव नगर पंचायतीने सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस याना  लेखी दिल्यानंतर दिनेश सणस यांनी हे अनधिकृत पथदिवे काढून टाका अशी मागणी नगर पंचायतिकडे अनेकवेळा मागणी करूनही नगर पंचायतीचे प्रशासन "ऍक्शन मूड" मध्ये येत नसल्याने नगर पंचायत  प्रशासनावर नक्की कुणाची दहशत व दबाव आहे असा सवाल उपस्थित करत याविरुद्ध  आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना दिनेश सणस म्हणाले, नगर पंचायतिकडे कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पैसे नाहीत जे कर्मचारी आज गटर, नाले साफसफाई करून कोरेगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांचे पगार मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. परंतु ज्यांची बोटे कायम तुपात आहेत अशा लोकांची विजबील नगर पंचायत भरत आहे. हे पथदिवे काढून टाकल्यास नगर पंचायतीचे लाखो रुपये बचत होऊन हेच पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरल्यास त्यांचा दुवा नगर पंचायत प्रशासनाला मिळेल असे आमचे म्हणणे असून काही लोकांना नगर पंचायतिची वीज, पाणी मोफत मिळून आपल्या कुटूंबाची आर्थिक भरभराट करण्यासाठीच नगर  पंचायतीचे पद हवे आहे. आणि यासाठीच त्यांचा प्रयत्न असून त्यांच्या पाठीशी नगर पंचायत प्रशासनाचा हात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
चौकट सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस यांनी नगर पंचायतीकडे निवेदन दिल्यानंतर नगर पंचायतीने तातडीने पथदिवे काढण्याची मोहीम  सुरू केली परंतु एका ठिकाणी नगर पंचायत कर्मचाऱ्यांना काम करू दिले नाही त्यांना माघारी यावे लागले आशा ठिकाणी पोलीस संरक्षण घेऊन आशा लोकांवर नगर पंचायत गुन्हा का दाखल करत नाही? असा सवालही दिनेश सणस यांनी बोलताना उपस्थित केला.चौकट तर शासनाचे श्राद्ध घालणार 
कोरेगाव नगर पंचायत प्रशासनावर मोठी राजकिय दहशत आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या बगलबच्चनच्या घरावर सहा, सात, दहा असे पथदिवे बसविण्यात आले आहेत. याविरुद्ध माझ्या निवेदनाचे काय झाले अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांकडे केली असता आपण अनधिकृत पथदिवे काढणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा? असे उत्तर त्यांचेकडून मला मिळाले असल्याची माहिती दिनेश सणस यांनी दिली. लवकरच अनधिकृत पथदिव्यांचे व्हीडिओ रेकॉर्डिंग  करून आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दाखवणार असल्याचेही सणस यांनी नमूद करून  त्यांच्यावरही राजकिय दबाव येऊन याकारवाई न झाल्यास जळगावनाक्यावर  शासनाचे श्राद्ध घालण्याचा इशाराही सणस यांनी दिला आहे.]

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.