पुसेगाव नजीक पोकलेनला दुचाकीची धडक खटाव येथील एक युवक ठार तर एक जखमी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
पुसेगाव नजीक पुसेगाव हद्दीत असणार्या निलेश बेकरी शेजारील पुलावर काम करीत असणाऱ्या उभ्या पोकलेनला दुचाकीची धडक बसून एक जण ठार तर एक जण जखमी झाला असून सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
. पुसेगाव ते खटाव या प्रमुख राज्यमार्गावरील रस्त्याच्या पुलाचे जागोजागी काम चालू असून अनेक बऱ्याच ठिकाणी काम चालू असताना देखील कुठेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत किंवा उभ्या असणाऱ्या पोकलेन शेजारी रिप्लेक्टर बॅरिकेट्स दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत आणि त्यामुळेच पुसेगाव नजीक असलेल्या पुसेगाव हद्दीतील निलेश बेकरी नजीक पुलाच्या कामासाठी उभा असलेल्या पोकल्यानला दुचाकी मोटर सायकल क्रमांक एम एच. 11. एस 9184 बॉक्सर कंपनीची धडक बसली धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पोकलेन मध्ये घुसली होती या अपघातात खटाव येथील युवक महेश दशरथ चव्हाण वय 29 याचा जागीच मृत्यू झाला तर कपिल राजेंद्र गुंजवटे वय 32 राहणार खटाव हे जखमी झाले असून सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर पोकलँड हा पांढरे कंट्रक्शन वावरहिरे कंपनीचा असून सोमवारी रात्री उशिरा हा अपघात घडला आहे.
Comments
Post a Comment