पत्रकार राहुल तपासे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न महामार्गावरील घटना.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
जावली ता .जावली येथील महामार्गावरील रायगाव येथे चालत्या कारमध्ये दारू पीत असणाऱ्याकडे बघितल्याच्या कारणातून चिडून जाऊन संशयितांनी सातारा जिल्ह्यातील एबीपी माझा चे वरिष्ठ पत्रकार राहुल तपासे (रा.गुरुवार पेठ सातारा )यांच्या कारला धडक देऊन अपघात करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना तात्काळ संशयितांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
ही घटना दिनांक 30 मे रोजी रात्री साडेबारा वाजता रायगाव गावाच्या हद्दीत महामार्गावर घडली आहे तक्रारदार राहुल हिंदुराव तपासे वय 48 रा. गुरुवार पेठ सातारा. हे त्यांच्या एम .एच. 11 बी .झेड. 15 19 या ब्रिजा कार मधून साताऱ्याकडे येत होते त्यावेळी एक आलिशान लजगरी गाडीमध्ये तिघेजण मद्यप्रचार करत कार चालवत होते ही बाब राहुल तपासे यांनी पाहिली आमच्याकडे का पाहिले या कारणावरून चिडून जाऊन संशयितांनी आपापसात संगनमत करून चिडून तक्रारदार राहुल तपासे यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या ब्रीजा कारला धडक दिली सुदैवाने या घटनेत राहुल तपासे बचावले या घटनेनंतर संशयीत कार चालक मात्र तेथून कार सह पसार झाले जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी ही बाब सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना सांगितली, यानंतर दोघांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना या घटनेची माहिती देऊन संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली राहुल तपासे सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार असून त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे एसपी भुईज पोलिसांना तत्काल तपासाच्या सूचना करतात गुरुवारी या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस संशयितांकडे कसून चौकशी करत असून इतर दोघे जण कोण आहेत व त्यांचा उद्देश काय होता ,संशयित आरोपींकडे कार कोणाच्या मालकीची आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
Comments
Post a Comment