किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अंबादास कदम.
सातारा 24 तास न्यूज. मुख्य उप संपादक. अकबर भालदार.
पुसेगाव. संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे आज पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी पारपडली.डॉ. तन्मय मेहता सांगली येथील यूरोलॉजिस्ट यांनी व.डॉ. पृथ्वीराज दोशी.डॉ. अंबादास कदम.डॉ. शिंदे हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ या सर्व टीमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडण्यास सहकार्य केले. तर पी सी एन एल एक अत्याधुनिक शस्त्र क्रिया आहे. पूर्वी फक्त पुणे व मुंबई येथे यशस्वीरित्या होणारी शस्त्रक्रिया आज पुसेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल आणि सर्जिकल सेंटर च्या अत्याधुनिक ऑपरेशन थेटर मुळे यशस्वीरित्या पार पडली आहे. आता रुग्णांना पुणे मुंबई सांगली कोल्हापूर येथील न जाता पुसेगाव मध्ये यशस्वीरित्या उपचार करण्यात करता सुविधा उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर पुसेगाव पं.पु. श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये सलग 22 वर्षे संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर यांच्या माध्यमातून 24 तास सेवा उपलब्ध करून ठेवले आहेत. पुसेगाव व पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील उत्कृष्ट स्त्री रोगांचे चांगले प्रकारे निदान करून अहोरात्र सेवा देऊन रुग्णाला बरे करून जीवदान दिल्याने.रुग्णच न्हवे तर त्यांच्या कुठूबातील सदस्य देखील डॉ. कदम यांना देवदूत मानत आहेत.पुसेगाव सारख्या ग्रामीण भागात पहिले अद्यावत संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर मध्ये जर्मन मेड लेझर मशीनचे अनावरण करण्यात आले. संजीवनी हॉस्पिटल मध्ये आज पर्यंत लॅप्रोस्कोपी. यूरोलॉजी. इंडॉस्कॉपी. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया 24 तास ऑथोपेडिक सर्जन इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याने. शस्त्रक्रिया केले जात आहेत. डॉ. कदम यांचे मित्र डॉ. आनंद अष्टुरे हेदेखील डॉ. कदम यांच्या पाठीशी उभे राहून 24 तास उत्कृष्ट सेवा रुग्णांना देत आहेत. डॉ. आनंद हे अस्थिरोग तज्ञ असल्याने रुग्णांना वेळेत सेवा मिळत आहे. संजीवनी हॉस्पिटल ट्रोमा सेंटर मध्ये डिजिटल एक्स-रे फिजिओथेरपी. आद्याधुनिक ऑपरेशन थिएटर. अपघातातील सर्व रुग्णांना उपचार. मणक्याच्या विकारावर उपचार मक्याच्या शस्त्रक्रिया. संधिवात. गुडघेदुखी गुडघ्याच्या शस्त्रक्रिया. फिजीथोरिपी मशिनद्वारे सांधेदुखी. कंबर दुखी. नसांचे आजार व उपचार सुविधा उपलब्ध आहेत.
त्याच बरोबर डॉ. अंबादास कदम यांना पुसेगाव ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ म्हणून मानले जाते. त्यांनी 22 वर्षे संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर पुसेगाव मध्यमातून 24 तास अहोरात्र सेवा देवून रुग्णांना चांगली संजीवनी दिली. डॉ. अंबादास कदम यांना मुंबई येथे जग प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्रीरोग तज्ञ म्हणून Time cybermedia तर्फे पुरस्कार प्रदान करून राष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला. या सन्माना बाबत पुसेगाव पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
Comments
Post a Comment