ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
ज्योतिष हे अनुभव शास्त्र आहे .ते जीवनासाठी दिशा दर्शक शास्त्र आहे .माझ्या आई वडिलांचा ज्योतिष वर प्रचंड विश्वास होता . ज्योतिष हे मार्गदर्शन शास्त्र आहे .यातून अनेकांना आपल्या प्रश्नावर मार्गदर्शन मिळू शकते.माझी आई बावळेकर गुरुजी यांना ज्योतिष पाहण्यासाठी घरी बोलावून घ्यायची .ज्योतिष द्वारे समाजा मध्ये चांगले प्रबोधन होऊ शकते .
गोंदवले ता माण येथे राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते .अध्यक्ष स्थानी आद्य शंकराचार्य विधा नरसिंह भारती होते.पंचागकर्ते मोहन दाते ,पंडीत रमनलाल शहा ,किसन पुजारी ,ज्ञानेश्वर भोर ,डॉ विकास खिलारे ,चंद्रकांत शेवाळे ,जयश्री बेलसरे,विठ्ठल कुलकर्णी ,विठ्ठल कुलकर्णी,विलास कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी अनेक नामवंत वक्ते यांची व्याख्यान झाले .यांचे आयोजन वरुड चे वेद मूर्ती नंदकुमार जोशी यांनी केले होते .त्यांचा पुणे ज्योतिष मंडळ चे अध्यक्ष व दा भट यांचे मार्फत पाच हजार रुपये ,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .गोंदवले सारख्या गावात एवढे मोठे अधिवेशन भरवल्या बद्दल सर्वांनी जोशी गुरुजी यांचे आभार मानले.
संयोजन महेश कुलकर्णी तर सूत्रसंचालन प्रा दिलीप पुस्तके आभार चित्तरंजन खटावकर यांनी मानले
Comments
Post a Comment