सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग येथे अनैतिक संबंधातून तिहेरी खुन.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग येथे अनैतिक संबंधातून तिहेरी खुन
   

कोरेगाव प्रतिनिधी  आज्जू मुल्ला 


 सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग पोस्ट शिरंबे येथील राजेंद्र भिकू सपकाळ यांचे घरांमध्ये भाड्याने राहण्यास असणारा दत्ता नारायण नामदास यांचे सोबत राहणारी महिला योगिता व तिच्या दोन मुलांचा अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून दत्ता नारायण रामदास याने  खून केल्याची घटना उघडकीस आली असून दत्ता रामदास याला रहिमतपूर पोलिसांनी अटक केली आहे.रहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 रोजी ठाणे अंमलदार एम ए कुलकर्णी यांना शिरंबे तालुका कोरेगाव येथील पोलीस पाटील सचिन सुतार यांनी समक्ष येऊन सांगितले राजेंद्र भिकू सपकाळ राहणार वेलंग  तालुका कोरेगाव यांचे घरांमध्ये भाड्याने राहण्यास असणारा दत्ता नारायण नामदास यांचे सोबत राहणारी महिला योगिता हि मयत अवस्थेत असल्याची माहिती रहिमतपूर  पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रमोद सावंत सह  पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मांडवे पोलीस कॉन्स्टेबल देशमुख. शिरंबे गावचे पोलीस पाटील सचिन सुतार घर मालक राजेंद्र भिकू सपकाळ त्यांनी वेलंग येते  जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता योगिता मयत अवस्थेत दिसून आली  त्यानंतर एक स्त्री पंचा सह दोन  पंचाचे समक्ष मयताच्या दिसता परिस्थितीनुसार मरणोत्तर पंचनामा केला. मयत महिला योगिता हिचे  गळ्यास ठीक ठिकाणी ओरखडले  तसेच नाकातून रक्तस्त्राव झालेला  चेहरा व डोळे फुगलेले व त्वचा  निळसर काळी झालेली दिसत होती त्यावरून सदर महिला योगिता  हिचा घातपात झाल्याचा संशय आल्याने सदर मयत  सोबत राहणारा दत्ता नारायण रामदास याचे बाबत सदर गावातील घर मालक राजेंद्र भिकू सपकाळ,चांगदेव मदने व हिराबाई मदने यांच्याकडे चौकशी केली असता तो गावांमध्ये दिसत नाही असे सांगितले तसेच त्याचे मूळ गावा बाबत माहिती घेतली असता तो राजेबोरगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील असल्याचे समजले तसेच त्याची बहीण ज्योती बापू आईवळे ही श्रीपुर बोरगाव तालुका अकलूज जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजले अकलूज पोलीस च्या माध्यमातून श्रीपूर बोरगाव पोलीस पाटील यांचे संपर्क साधून ज्योती अहिवळे यांचे घरी जाणेस सांगून दत्ता नारायण रामदास यावर चौकशी करण्यास सांगितले ज्योती अहिवळे येथे चौकशी केली असता दत्ता नारायण रामदास हा तिथे आल्याचे सांगितले श्रीपूर बोरगाव पोलीस पाटील यांनी ताब्यात घेऊन अकलूज पोलीस ठाणेत घेऊन गेले  रहमतपुर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी जाऊन नामदास यात ताब्यात घेतले.
संशयित आरोपी दत्ता नारायण नामदास वय 30 वर्षे राहणार राजे बोरगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद सध्या राहणार वेलंग पोस्ट शिरंबे तालुका कोरेगाव याने केलेल्या खुणाची माहिती दिली ती पुढील प्रमाणे दिनांक 15 रोजी रात्री दहा वाजता योगिता तसेच तिची मुले समीर व तनु असे जेवण करून झोपी गेली असता  योगिता हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे संशयातून त्याने योगिता तिचा गळा दाबून तीस जीवे ठार मारले तसेच मुले समीर व तनु यांना बाथरूमला जायचे बहाना करून झोपेतून उठवून मोटारसायकलवरून त्यांचे मळ्यातील असणारे एका विहिरी मध्ये घेऊन जाऊन विहिरीमध्ये ढकलून देऊन त्यांचा खून करून राहते घरास बाहेरून कडी लावून घरातून निघून गेला  असल्याचे सदर दत्ता नामदास याने कबुली दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील  तपास चालू आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.