फौजी जवान संग्राम फडतरे भुरकवडी ता. खटाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार.

फौजी जवान संग्राम फडतरे भुरकवडी ता. खटाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

वीर जवान तुझे सलाम... भारतमाता की जयच्या घोषणा देत भुरकवडी (ता.खटाव) येथील जवान संग्राम विजय फडतरे यांच्यावर रविवारी (ता.१२) रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 फडतरे हे २२ मराठा लाईफ लाईट इनफंट्री बटालियनमध्ये सैन्यदलात हवालदार या पदावर कार्यरत होते. २००३ साली सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी सैन्यदलात १९ वर्ष सेवा बजावली होती. नुकतीच ते नायब सुभेदार पदाच्या परिक्षेत पासही झाले होते. फडतरे यांचे चंदीगड (हरियाणा) येथे तीन दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटूंबियांसह गावावर शोककळा पसरली होती. काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या आई, वडील, पत्नी व कुटूंबियांनी फोडलेला हंबरडा प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकत होता. त्यानंतर त्यांची फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. वीर जवान तुझे सलाम... भारतमाता की जय, जवान संग्राम फडतरे अमर रहेच्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. ग्रामस्थांनी मिरवणूक मार्गावर रस्त्याकडेला रांगोळी काढली होती. तसेच फडतरे यांच्या पार्थिवावर ग्रामस्थांनी फुलांची उधळण केली. येरळा नदीकाठी स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, नायब तहसिलदार रविराज जाधव,पोलीस उपनिरीक्षक दीक्षित, २२ मराठा बटालियनचे सुभेदार संतोष माने, नायब सुभेदार अमजद मुजावर,हवालदार रफिक मुजावर, सैनिक बोर्डाचे सुभेदार रामचंद्र जाधव,येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, सरपंच छगनराव कदम,ग्रामसेविका धनश्री गंमरे आदीसह जयदीप फाउंडेशन च्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

जवान फडतरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बंधू,  भावजय एक मूलगा, एक मूलगी असा परिवार आहे.
  ते सोसायटीचे माजी संचालक विजय फडतरे यांचे सुपुत्र तर विक्रम फडतरे यांचे बंधू होत. तर गावातून व परिसरातून हजारो लोकांनी या अंत्ययात्रेसाठी उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.