राष्ट्रवादीचा वर्धापनदिन कोरेगावात लोकोपयोगी उपक्रमाने साजरा**विरोधी पक्ष नेत्या संजीवनी बर्गे यांनी दिली अंगणवाडीला उपयुक्त भेट*

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन कोरेगावात लोकोपयोगी उपक्रमाने साजरा*
*विरोधी पक्ष नेत्या संजीवनी बर्गे यांनी दिली अंगणवाडीला उपयुक्त भेट*


कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धानदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या सौ. संजीवनी सचिन बर्गे व माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे यांचे वतीने कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग ९ मधील जानाई गल्ली अंगणवाडीला संपूर्ण गॅस कनेक्शनचे साहित्य वितरित करण्यात आले. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे विचार बळकट करण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यानुसार शहरातील प्रभाग ९ च्या जानाई गल्ली येथील  अंगणवाडी क्रमांक ४८ ला आवश्यक असणाऱ्या गॅस साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अजित बर्गे, नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे, प्रितमभैय्या बर्गे, गणेश धनावडे, प्रभागातील जेष्ठ नागरिक किसनराव बर्गे, दीपक मालुसरे, संतोषनाना बर्गे, सचिनबापू बर्गे, श्रीकांत श्रीरंग बर्गे, दीपक बर्गे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षक लता ननावरे, अंगणवाडी सेविका माधवी पोरे, अंगणवाडी मदतनीस अंजली मुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व बर्गे दाम्पत्यांचे आभार मानून ऋण व्यक्त केले आणि यापुढेही असेच सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.यावेळी बोलताना सचिनभैय्या बर्गे म्हणाले, प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व अंगणवाड्याना आपले कायम सहकार्य राहील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून शहरातील सर्व विभागात विकास कामाबरोबरच शिक्षणाच्या प्राथमिक सुविधा बळकट करण्याचा प्रयत्न राहील.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.