ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया पदाधिकारी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.

ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया पदाधिकारी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न 
सातारा 24 तास न्यूज. प्रतिनिधी.निशिकांत अहिवळे. 
 
फलटण. ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष मा.बबनराव मदने उर्फ नाना.यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे.या कार्यातून त्याना साथी सामाजिक संस्थेच्या वतीने ह्युमन राईट कमिटीच्या कार्याचे आढावा घेऊन जिल्हाध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना यांना कोकरे सर यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अशा सामाजिक कार्यास त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ह्यूमन राइट्स कमिटीचे पदाधिकारी श्री. बापूराव शिरतोडे साहेब. श्री. संपतराव गुंजवटे साहेब. श्री सूर्याजी जगताप साहेब. या चौघांचा वाढदिवस असल्याने आज फलटण येथे ह्यूमन राइट्स फाऊंडेशन ऑफ इंडिया कमिटीचे माजी अध्यक्ष व सदस्य म्हणून कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते बच्चुभाई मेहता यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील दिर्घआयुष्यासाठी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीरजी भोसले साहेब. त्याचबरोबर ह्यूमन राइट्स फौंडेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटी. वाई. कोरेगाव. खटाव. माण. फलटण. इंदापूर. बारामती तालुक्यातील सर्व पदाधिकारी सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिवादन केले. कार्यक्रम प्रसंगी ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटी. फलटण तालुका कमिटीचे. पदाधिकारी सदस्य त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.