येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर च्या माध्यमातून 992 नवीन वाण देणार 7350 रुपये दर संस्थापक अध्यक्ष संजय भगत.

येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर च्या माध्यमातून  992 नवीन वाण देणार 7350  रुपये दर संस्थापक अध्यक्ष  संजय भगत. 
      
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम

  येस ग्रुपच्या माध्यमातून बीजोत्पादनाचा दहा वर्षाचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन पिकाचे बीजोत्पादन हा उपक्रम गेली चार वर्षे प्रभावीपणे राबवणाऱ्या येस ग्रुप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना करार पद्धतीने 7350 रुपये पर्यंत सोयाबीनला प्रति क्विंटल दर  मिळणार असल्यामुळे सोयाबीन उत्पादनात एक वेगळी क्रांती होईल असे प्रतिपादन येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत यांनी जाखणगाव येथे केले
        येस ग्रुप ऑफ कंपनीज व मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन च्या माध्यमातून  जाखणगाव ता. खटाव जि. सातारा येथील येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी चे करारशेती राहुरी कृषी विद्यापीठाचे  KDS 992, 726,753 तसेच MACS-1188 सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रमावेळी येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत बोलत होते यावेळी कंपनीचे संचालक बाळकृष्ण चव्हाण , सौ. बाळूताई जगताप ,अध्यक्ष राजेंद्र भगत ,सचिव संतोष शिंदे ,रमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती 
        शेतकरी संघटनेत काम करत असताना  आंदोलने ,सत्याग्रह ,मोर्चे काढून ही कधी शेतकऱ्यांना ऊस अपवाद वगळता हमीभाव मिळून देता आला नाही शेतकऱ्यांशी सोयाबीन पुनर्खरेदी करार करून  7200 ते  7350 रुपये फिक्स सोयाबीन  दर शेतकऱ्यांना ठरवून दिला आहे तसेच  करार नसलेल्या सभासद शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला बाजारभावापेक्षा 50 रुपये  ज्यादा चा दर देणार असल्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन, तेलबिया उत्पादनाबाबत चेतना व जागृती निर्माण झाली असून ही आज देशाची गरज आहे असेही येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत म्हणाले 
      येस ग्रुपच्या माध्यमातून पाच वर्षापासून सोयाबीन बियाणे बदलाची क्रांती जाखणगाव परिसरात संजय भगत यांच्या माध्यमातून झाली त्याला एक चळवळीचे रूप मिळाले व आज येस फ्रेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना  7350 रुपया पर्यंत प्रति क्विंटल दर मिळणार आहे  याची खात्री झाल्यामुळे शेतकरी ज्यादा चे व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतील यापुढे शेतकर्‍यांनी येस ग्रुप शी आपले नाते जोडावे व चांगल्या प्रतीचे बियाणे मिळवावे तसेच सेंद्रिय शेतीची कास धरावी असे  आवाहन कंपनीचे संचालक बाळकृष्ण चव्हाण यांनी केले 
       मदरअर्थ हेल्थ फौंडेशन व  येस सेंद्रिय शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने  कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना  2000 रुपये  किमतीची सेंद्रिय खते ,औषधे मोफत दिली जाणार आहेत अशी घोषणा येस सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी   यावेळी केली .
       कार्यक्रमावेळी सोसायटी चेअरमन सोमनाथ रणनवरे, ओंकार भगत, गो सेंद्रिय शेतकरी गटाचे सचिव रमेश जाधव, सचिन शिंदे ,अतुल चव्हाण, बबन सूर्यवंशी, बापूराव चव्हाण ,धनाजी जाधव ,बाळूकाका शिंदे ,पोपट चव्हाण ,हनुमंत शिंदे आधी आदी सभासद शेतकरी उपस्थित होते
   उपस्थितांचे आभार कंपनीचे व्यवस्थापक रणजित भोसले यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.