म्हसवड येथे फर्निचर गोडाऊनला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान
पुसेगाव प्रतिनिधी पंकज
कदम
म्हसवड येथील सातारा पंढरपुर रोडवरील सह्याद्री ढाब्याच्या समोर असलेल्या जवाहरलाल मोतीलाल शहा यांच्या गोडाऊन मधील प्लमबीगच्या प्लास्टिक पाईप , तंबाखू, व इतर प्लास्टिक साहित्य व जुने फर्निचरला सांयकाळी साडे पाच वाजता अचानक आग लागल्याने मोठा आगीचा भडका उडाला होता म्हसवड पालिकेचा अग्निशमन ना दुरुस्त असल्याने तो दुरुस्ती साठी कोल्हापूर येथे गेल्याने आग विझवण्यात अडथळे येत होते तिन पाण्याच्या टँकरने ही आग विझली जात नव्हती अखेर पालिकेच्या एसटीबीच्या प्रेशरने पाण्याचा फवारा आगीवर मारुन आग विझविण्याचा प्रयत्न अनेक लोक करत होते तरी हि आग जवळजवळ तिन तास सुरु होती या आगीत लाखो रुपयेचे नुकसान झाले
म्हसवड दहिवडी रोडवर सह्याद्री ढाब्याच्या समोर तुपे यांची चहाची टपरी व ऊसाच्या रसाचा घाणा सुरु होता त्याच्या पाठीमागील बाजूस शहा यांच्या मालकीची जाग व गोडाऊन होते त्या गोडाऊन मध्ये शहा याच्या दुकानाचे प्लास्टिक पाईप, पीव्हीसी नळाचे साहित्य , सुट्ट्या तंबाखूची पोती, व इतर नवे जुने फर्निचर साहित्य या गोडाऊन मध्ये होते त्याने अचानक पेट घेतला हा हा म्हणता या आगीने रौद्र रुप ऐवढे मोठे घेतले होते १५ ते २० फुटा पर्यंत या आगीची धग लागत होती पीएसआय बाजीराव ढेकळे विशाल भंडारे, पोलीस हवालदार नितीन काकडे, ट्रॅफिक हवालदार वाघमोडे, आदी कर्मचारी यांनी या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली म्हसवड पालिकेच्या अग्निशमन दलाला व मुख्याधिकारी माने यांना अग्निशमन साठी फोन केले मात्र अग्निशमन ना दुरुस्त असल्याने पाण्याचे टँकर आग लागली त्याठिकाणी पाठवून गोडाऊन मध्ये पाणी सोडले तर पांडुरंग पिसे (दहिवडी) यांनी त्यांच्या शेतातील पाणी हि आग विझवण्यासाठी दिले खाजगी पाण्याचा टॅकर व अमोल गुजर यांनी हि त्यांचा टॅकर आणुन पालिकेच्या एसटीबीच्या मशीन द्वारे आग लागलेल्या गोडाऊन मध्ये पाण्याचा प्रेशर देवून रात्री आठ पर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न सुरु होता या आगीत शहा याचे लाखेचे साहित्य साईडचा पत्रा वरील पत्रा जळून खाक झाला होता तर गोडाऊनच्या पुढील बाजुला तुपे यांचे चहाचे व ऊसाच्या घेण्याचे मोठे नुकसान झाले अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत
Comments
Post a Comment