कोरेगाव नगरपंचायतीचा व मुख्याधिकार्यांचा गलथान कारभार डाॅ.सतीश खंदारे यांचे स्पष्ट व परखड मत.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला
कोरेगाव नगरपंचायतीची स्थापना होऊन सुमारे ६ वर्ष होत आली आहेत
याबाबत कोरेगाव शहराच्या विकास कामाचा आढावा घेत डाॅ. सतीश खंदारे म्हणाले की. या शहरात पायाभूत सुविधा व अन्य सुविधांबाबत कोरेगाव नगरपंचायत व प्रशासन सक्षमपणे काम करताना दिसून येत नाही.
कोरेगाव शहरामध्ये रस्ते,गटर्स, पाणी पुरवठा योजना, स्टीट लाईट यावर भाष्य करताना डाॅ. खंदारे म्हणाले की, दिवसेंदिवस कोरेगाव शहराची लोक संख्या वाढत आहे. या शहरात व उपनगरमधील रस्ते उखडलेले आहेत. गटारांची वेळच्या वेळी साफसफाई होत नाही.तसेच अनेक ठिकाणी गटारामध्ये गवत, मोळ,आळूचे प्राबल्य वाढल्याने व चोकअप झालेली असल्याने बर्याच ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होतच नाही.अनेकदा गटारांतील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते.
कोरेगाव शहरासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार्या जलशुध्दीकरण यंत्रणांची योग्य रितीने देखभाल न केल्याने ती सडलेली, गंजलेली आहे. कोरेगाव शहर व उपनगरमधे मातीमिश्रित, गाळमिश्रित व गढूळ पाणी पुरवठा करण्यात येत असतो.तसेच गेल्या वर्षी बाजारपेठेत पाइप मधील सडलेल्या, कुजलेल्या पक्षांच्या अवशेषामुळे पाणी मिळणे बंद झाल्याने नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी रस्ता खोदून दुसरी पाईप बसवून पाणी पुरवठा चालू केला. म्हणजे याचा अर्थ असा होतो कि, इतके दिवस पक्षांच्या कुजलेल्या, सडलेल्या अवयवातून आलेले पाणी शेकडो लोकं पीत होते.
कोरेगाव शहरात अनेक ठिकाणी खांबावरील लाईट बंद आहेत.तर काही ठिकाणी खाजगी मालमत्ता प्रकाशाची सोय केली आहे. हे कितपत योग्य आहे.
कोरेगाव शहरात अनेक ठिकाणी कचर्याचे ढिगारे आहेत. विशेषतःआझाद चौकातील मन्डई
जवळपासचा भाग, नगरपंचायतीच्या हाकेच्या अंतरावरील ओढ्यात व त्या जवळचा परिसर, त्याचप्रमाणे शांतीनगरच्या रस्त्याच्या कडेला नेहमी मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत असतो.अशा वेळी घनकचरा व्यवस्थापन नेमके काय काम करत असते?
कोरेगाव शहरातील शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. बाजार तळाजवळच्या शौचालयाच्या पाठभिंतीमध्ये एका पिंपळाच्या झाडाच्या मोठ्या मुळ्या वाढल्याने ती भिंत चिरटली आहे.केव्हाही ती भिंत कोसळली जाऊन अनेकांचा
मृत्य ओढवला जाऊ शकतो.
मागील १० वर्षापासून कोरेगाव शहर स्मार्ट सिटी बनवण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. सुरूवातीला मा.आमदार शशिकांत शिंदे यांनी त्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु ते सत्यात उतरू शकले नाही.
मा. आमदार महेशजी शिंदे साहेबांनीही कोरेगाव स्मार्ट सिटी बनवण्याचे स्वप्न दाखवले आहे. शहरात आणि उपनगरमधील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आहेत परंतु अनेक ठिकाणी रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दुर्लक्षित व सडलेली जलशुध्दीकरण यंत्रणा बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सौरपथदिव्यांचे लवकरच मार्गी लागेल.त्याचबरोबर येत्या काळात जलशुध्दीकरण यंत्रणाही कार्यान्वित होईल.
गेल्या आठवड्यात नगरपंचायतीच्या बोर्डाच्या व आघाडीच्या सदस्यांनी नगरपंचायतीची गाडी ३ महिन्यांत रुळावर असे आश्चर्यजनक वक्तव्य करून कोरेगावच्या तमाम जनतेची दिशाभूल केली आहे. यावेळी महाराष्ट्र रस्ते प्राधिकरण व रस्ते विकास महामंडळाच्या गलथान कारभारामुळे कोरेगाव शहरातील खड्ड्यावर मात्र चकार शब्द काढला नाही.
वास्तविक कोरेगाव नगरपंचायतीमध्ये विकासासाठी सक्षम विरोधी पक्षनेत्याची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे.तसेच नगरसेवक अभ्यासू नसल्यामुळे विकासाची कामे ज्या गतीने व योग्य दर्जाची व्हायला हवी तशी ती होत नाहीत असे आढळून येते. त्यासाठी नगरसेवक व नगराध्यक्ष यानी वॉर्डमध्ये नियमीत फेरफटका मारून अडी अडचणी समजून घेऊन त्या जागेवरच सोडवण्याचे काम केले पाहिजे. कोरेगाव तलुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी सुसज्ज क्रीडांगण, बगिचे, नाट्यगृह व स्विमिंग पूल होणे आवश्यक आहे.
मुख्याधिकारी यांची उठ बस ही राजकारणी व कॉन्ट्राक्टर या लोकांसोबत अधिक असते.परंतू जन सामन्यांना त्या वेळ देऊ शकत नाहीत. लोकांच्या बरोबर त्यांचे वर्तन अत्यंत उधत व उर्मट असते. याबाबत त्यांच्या विरोधी अनेक तक्रारी आहेत व त्यांची खातेनिहाय चोकशी व्हावी अशी अनेकांची मागणी आहे.
कोरेगाव शहरात एकुण 30 अंगणवाडी आहेत. त्यांची ही दुरावास्ता झाली आहे . महिला व बाल विकास विभाग आणि नगरपंचायत या पैकी अंगणवाडया कोणाचाही अधिपत्याखाली नसल्याने या अंगणवाडयाच्या प्रश्नानी उग्र स्वरूप धारण केले आहे.या विषयी ना कुणाला खंत ना चिंता असे दिसून येते.
एकंदरीत कोरेगाव नगरपंचायती कडून पायाभूत व अन्य सुविधाबाबत ठोस पावले उचलली जावीत व मुख्याधिकारी यांच्या कामकाजात आणि वर्तवनुकित बदल व्हावा आशी कोरेगाव मधील सुजाण जागृत नागरिकांच्या मागणीत वाढ हाऊ लागली आहे.
Comments
Post a Comment