खातगुन सोसायटी चेअरमन पदी विजय मानसिंग लावंड तर व्हाईस चेअरमन पदी किसनगिरी जनार्दनगिरी गोसावी यांची निवड.
खातगुन सोसायटी चेअरमन पदी विजय मानसिंग लावंड तर व्हाईस चेअरमन पदी किसनगिरी जनार्दनगिरी गोसावी यांची निवड
पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम
खातगुन तालुका खटाव येथील सोसायटी निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणित राम रहीम शेतकरी विकास पॅनल ने स्वाभिमानी ग्रामविकास पॅनल चा 11/ 2 नें दणदणीत पराभव केला होता. या खातगुण सोसायटीची नुकतीच चेअरमनपदाची निवडणूक पार पाडण्यात आली त्यामध्ये चेअरमनपदी विजय मानसिंग लावंड यांची निवड झाली तर व्हाईस चेअरमन किसनगिरी जनार्दन गिरीगोसावी यांची निवड करण्यात आली.
श्री विजय मानसिंग लावंड यांनी पॅनल प्रमुख वसंत कृष्णा जाधव यांचे बरोबरीने राम रहीम शेतकरी पॅनल निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन राम रहीम शेतकरी विकास पॅनलचा 11/2 ने दणदणीत विजय झाला होता. त्याचेच फळ विजय मानसिंग लावंड यांना चेअरमन रुपाने मिळाले आहे
विजय मानसिंग लावंड यांची आपली राजकीय कारकीर्द फारच हलाखीत सुरू झाली. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आज पर्यंत त्यांनी इमाने इतबारे पार्टी मध्ये काम केले. आर्थिक दृष्ट्या फारच कमजोर अशी परिस्थिती असताना त्यांनी राजकारणाबरोबरच शेती व्यवसाय व व्यापारामध्ये उडी घेतली. आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन आपल्या घराची आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीने उभी केली. त्याच बरोबर छोट्या व्यापारा पासून सुरुवात करून आज विजय लावंड यांनी कांदा बटाटा व्यापारामध्ये पुसेगाव परिसरामध्ये आपला नावलौकिक साजेसा केला आहे. त्यांची मेहनत व लगन तसेच राजकारणाची आवड पाहता श्री पतित-पावन श्रीराम देवस्थान ट्रस्ट खातगुण या ट्रस्टच्या सचिव पदी निवड करण्यात आली. तसेच खातगुण येतील तंटामुक्त समितीचे उपाध्यक्षपद त्यांच्या वाट्याला आले. आणि आज येतील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पदी विराजमान झाले. त्यांच्या जीवनातील राजकीय सामाजिक आर्थिक असा खडतर प्रवास करून आपल्या योग्यतेच्या जोरावर विजय लावंड यांनी आज सोसायटीचे चेअरमन पदी आपल्या नावाप्रमाणेच आपली विजयी घोडदौड चालू ठेवली आहे. या सोसायटीच्या चेअरमन पदी विजय मानसिंग लावंड तर व्हाईस चेअरमन पदी किसंनगिरी जनार्दन गिरीगोसावी यांची निवड करण्यात आली. या त्यांच्या निवडी बद्दल आमदार शशिकांत शिंदे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सुरेश जाधव, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व नूतन चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, जेष्ठ नेते वसंत जाधव( गुरुजी ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment