सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमनपदी संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट निवडणूक पार पडल्यानंतर श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संतोषराव मुगुटराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या सहा जागा साठी नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली तिरंगी निवडणूक व पाच अपक्ष उमेदवार या झालेल्या लढतीत संतोष जाधव यांचे नेतृत्वाखालील श्री सेवागिरी रयत संघटनेने सहापैकी चार जागा मिळवल्या होत्या, तर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांचे नेतृत्वाखालील सेवागिरी नागरिक संघटना यांना एका जागेवर समाधान मानावे लागले तर रणधीर जाधव यांच्या सेवागिरी जनशक्ती संघटनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
अध्यक्षपदासाठी ट्रस्टच्या सभागृहात मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांचे अध्यक्षतेखाली देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी संतोष जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले. यावेळी विश्वस्त गौरव जाधव,सचिन देशमुख, रणधीर जाधव, डॉ. सुरेश जाधव, संतोष वाघ,सचिव अविनाश देशमुख, सहसचिव विशाल माने इ. उपस्थित होते.
पुसेगावच्या जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास श्री सेवागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने व मठाधिपती सुंदरगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सेवागिरी देवस्थानचा कारभार पारदर्शक व राजकारणविरहित केला जाईल असे सेवागिरी ट्रस्टचे चेअरमन संतोषसाहेब जाधव यांनी सातारा 24 तास न्यूज डिजीटल न्यूज चायनलशी बोलताना म्हणाले
Comments
Post a Comment