आर्ट ऑफ लिव्हिंगचे निढळ येथे उत्साहात रक्तदान शिबिर
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
निढळ ता.खटाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रातर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी ४३ जणांनी रक्तदान केले.
निढळ ता.खटाव आणि आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रामार्फत वाय एल टी पी हे युवकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री श्री रविशंकरजी वाढदिवसानिमित्त हनुमान विद्यालय निढळ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरा प्रसंगी योग टिचर .अमोल भुजबळ, संतोष खुस्पे,स्वाती भुजबळ,सुजाता खुस्पे, अविनाश जाधव, सुरज खुस्पे, प्रदीप खुस्पे, विलास चव्हाण, बंडू पाटोळे, डॉ.ज्ञानदेव सत्रे, दत्ता भुजबळ, नंदकुमार शिंदे, अनिल भोंडवे, अजिंक्य सोनवणे, आकाश सकुंडे, संजय सकुंडे, हेमंत सोनावणे, सिद्धम भिसे, श्रेयस शिपटे उपस्थित होते
यावेळी बोलताना अमोल भुजबळ यांनी सांगितले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे .प्रत्येकाने जीवनात रक्तदान करायला हवे.आपण केलेल्या रक्तदाना मुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. खऱ्या अर्थाने रक्तदान हे एखाद्या साठी जीवन दान आहे .आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आम्ही समाजाला योग शिक्षण देत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो .गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी विधायक कामे करून वाढदिवस साजरा करत असतो.प्रास्ताविक संतोष खूस्पे यांनी केले .आभार अविनाश जाधव यांनी मानले
Comments
Post a Comment