ह्युमन राईट फाऊंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था संलग्न ट्रॅडिशनल शोतोकान स्पोर्ट कराटे ऑर्गनायझेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.
ह्युमन राईट फाऊंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था संलग्न ट्रॅडिशनल शोतोकान स्पोर्ट कराटे ऑर्गनायझेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.
जिजाऊ मंगल कार्यालय फरांदवाडी ता. फलटण येथे मा.श्री.अनिलजी हिंगड सर राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री.बबनराव मदने सातारा जिल्हाध्यक्ष एच.आर. एफ. आनंदराव भोसले फलटण तालुकाध्यक्ष एच.आर. एफ.यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मा.श्री.दीपक राजे पांढरे सर निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्पोर्ट कराटे ऑर्गनायझेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. चारुदत्त शिपकुले साहेब सिविल जज जूनियर डिव्हिजन मा.श्री. रणधीरजी भोसले साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया मा.डॉ. संजय कृष्णाजी राऊत एमडी मेडिसिन मा. डॉ. मनोज खोमणे तालुका वैद्यकीय अधिकारी बारामती सर्वजण उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर. उदघाटक मा.सौ. विशाखा आढाव/ भोने मॅडम अवर सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई मा. श्री. दीपक राजे पांढरे साहेब निवृत्त न्यायाधीश.मा.रणधीरजी भोसले साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बबनराव मदने साहेब ह्युमन राइट फाउंडेशन ऑफ भारत सातारा जिल्हा अध्यक्ष सेन्सई रवींद्र बाळकृष्ण कराळे स्पर्धा प्रमुख मार्गदर्शक.आयोजक शकील सय्यद सर ब्लॅक बेल्ट 2nd दान सातारा जिल्हा सचिव एच.आर.एफ.या सर्वांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सत्कार मूर्ती माननीय प्रतिक मुकेश आढाव नायब तहसीलदार. मा. रामचंद्र मारुती मोहिते पोलीस निरीक्षक, मा. प्रिया बाळासाहेब घोरपडे न्यायाधीश मा.माधुरी दशरथ जाधव पी.एस.आय.या सर्वांचे शाल.श्रीफळ.पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.त्याचबरोबर ह्युमन राइट्स फॉउंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्थेच्या चालू वर्षी कामकाजाचे आढावा घेऊन रणधीरजी भोसले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांना समाज भूषण पुरस्कार कथाकथनकार मा. कोकरे सर यांच्या हस्ते देण्यात आला. त्याच बरोबर मा. बबनराव मदने उर्फ नाना सातारा जिल्हाध्यक्ष यांनादेखील समाजभूषण पुरस्कार सिने स्टार अभिनेत्री नयन राजेमाने यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे त्याचबरोबर उपस्थित मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मा.सौ. विशाखा आढाव /भोने मॅडम अवर सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांनी आपले मनोगत व्यक्त करीत पुढे म्हणाल्या की मुलींनी स्वतःच्या संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. व स्पर्धेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून चमकले पाहिजे. तसेच ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील मुलांसाठी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करून क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे. ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे कार्यात आपण योगदान व सहभाग भविष्यात देणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. शासन स्तरावरील काही योजना राबविण्यात याव्यात यासाठी शासन प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. ह्युमन राईट चे काम अनमोल आहे असे सांगत कौतुक केले.पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर कथाकथनकार मा श्री रवींद्र कोकरे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करते वेळी ते पुढे म्हणाले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेले मुले मुली यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चमकत राहावे त्याचबरोबर आपले आई-वडील यांचेदेखील नाव समाजामध्ये लोकीक करावे. व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन असेच चमकत राहावे असा आशीर्वाद देऊन कराटे विजेते स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर सिनेस्टार अभिनेत्री नयन राजेमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी त्या पुढे म्हणाल्या अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये मी स्वतः अनेक वेळा उपस्थिती दिली परंतु आज कराटे कार्यक्रम प्रसंगी मला आमंत्रित केले. हे माझे मी भाग्य समजते अशा कराटे स्पर्धेमध्ये मुले व मुली मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्यांच्या मधील असणारा जोश पाहून मी खूप समाधानी झाली असल्याचे सांगत स्पर्धक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा.श्री. प्रा. नितीन नाळे सर सातारा जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांनीही आपले मनोगत व्यक्त करतेवेळी ते पुढे म्हणाले. आम्ही विद्यार्थी यांच्यासाठी नसून विद्यार्थी हा आमच्यासाठी आहेत. असे सांगत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत गाऊन विद्यार्थ्यांना गीतांमधून प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मा. सौ विशाखा आढाव/भोने मॅडम. मा.श्री.दीपक राजे पांढरे साहेब. मा. सचिन आढाव साहेब सामाजिक कार्यकर्ते उद्योजक या सर्वांच्या हस्ते कार्यक्रम प्रसंगी उद्घाटन करून सौ. विशाखा मॅडम यांच्या हस्ते कराटे स्पर्धेचे फाईट लावून कार्यक्रम स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेत सेन्सई रवींद्र बाळकृष्ण कराळे स्पर्धा प्रमुख व मार्गदर्शक म्हणून कामकाज पाहिले तर आयोजक शकील बाळाभाई सय्यद ब्लॅक बेल्ट 2nd . दान. त्याच बरोबर सर्व कराटे रिफ्री पंच प्रशिक्षक विशेष राष्ट्रीय पंच यासीन झाम्बरे सर. महेश भोकरे. कराटे स्पर्धा फाईट लावणारे मान्यवर कर्वे सर. लखन दादा बरकडे. प्रकाश कृष्णा तरडे. दत्तात्रेय नरोटे. संतोष कारंडे. लाला टकले. शिवाजी पिसाळ. अनिल कारंडे. डॉ. राम राजे बरकडे. भीमराव बिचुकले. गणेश सुळ. केशव धायगुडे. अक्षय तरडे. गणेश तरडे. सोमनाथ बागाव. देवदास बागाव. मारुती रुपनवर. ह.भ.प गणेश भोसले ह.भ.प सतीश कारंडे. तात्यासो सुळ या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये विजेते स्पर्धक यांना ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया चे सर्व पदाधिकारी रणधीरजी भोसले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. श्री बबनराव मदने सातारा जिल्हाध्यक्ष. महावीर व्होरा जिल्हा खजिनदार. मोहन साळुंखे जिल्हा सल्लागार. सुरेश आडागळे संपर्कप्रमुख. बापूराव शिरतोडे जिल्हा सह सल्लागार. राजाभाऊ मदने जिल्हा सेक्रेटरी. मनोज जावळे सर जिल्हा सल्लगार. शशिकांत निकाळजे जिल्हा सेक्रेटरी. निशिकांत अहिवळे संपर्कप्रमुख. सुखलाल चव्हाण जिल्हा सदस्य सूर्याजी जगताप जिल्हा सह सेक्रेटरी. आनंदराव भोसले फलटण तालुकाध्यक्ष. दिलीप ननवरे फलटण तालुका उपाध्यक्ष. नागेश दळवी फलटण तालुका खजिनदार. संपत गुंजवटे फलटण सेक्रेटरी प्रवीण अहिवळे फलटण तालुका संपर्कप्रमुख. आनंदराव भोसले फलटण तालुका सदस्य. मोहन अलगुडे फलटण सहखजिनदार.धर्मशिंग निंबाळकर फलटण तालुका सह सेक्रेटरी. अकबर भालदार सातारा 24 तास न्यूज मुख्य संपादक. सेंट्रल प्रेस. केंद्रीय पत्रकार संघ खटाव तालुका अध्यक्ष. एच.आर.एफ.खटाव तालुका अध्यक्ष. नितीन घोरपडे सर सातारा 24 तास न्यूज मुख्य संपादक. सेंट्रल प्रेस. केंद्रीय पत्रकार संघ खटाव तालुका उपाध्यक्ष. एच.आर.एफ.खटाव तालुका उपाध्यक्ष. जितेंद्र फाळके कोरेगाव तालुका अध्यक्ष. सौ. रंजना केंजळे कोरेगाव तालुका महिला अध्यक्ष. धर्मेंद्र चव्हाण जावली तालुका अध्यक्ष. सौ. सुमन पोकळे मॅडम माण तालुका अध्यक्ष. तेजस बोराटे सातारा तालुका अध्यक्ष. शकील सय्यद उपाध्यक्ष साथी सामाजिक संस्था. एच.आर.एफ.फलटण तालुका सचिव व प्रमुख पाहुणे. उपस्थित मंडळी यांच्या हस्ते विजेते स्पर्धक विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल. सिल्वर मेडल.कांस्य मेडल. सन्मानचिन्ह. चषक.प्रमाणपत्र व रोख रकमेचे बक्षिसे वितरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन श्री नवनाथ कोलवडकर. व नितीन घोरपडे सर यांनी केले. तर शकील सय्यद यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment