सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनने पुसेगांव पोलीस स्टेशनचा आदर्श घेण्याची गरज सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल
सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनने पुसेगांव पोलीस स्टेशनचा आदर्श घेण्याची गरज सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल
पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा क्रीडा विभागाकडे पाठपुरावा करून सदर पोलीस कर्मचारी यांना व्यायाम करण्यासाठी जिम तयार करून पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन समोर एक आदर्श निर्माण केला आहे हा आदर्श प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले यावेळी त्यांच्या हस्ते सुसज्ज जिमचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे साहेब उपस्थित होते
पुढे बोलताना पुसेगावला पोलीस ठाण्याला असणारे तत्कालीन अधिकारी विश्वजीत घोडके यांनी या जिमसाठी विशेष पाठपुरावा केला असे म्हणत त्यांचे कौतुक केले तर गेले दोन वर्षांमध्ये कोरोना सारख्या महामारी रोगामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते तरी अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावात व वाडी-वस्तीवर लोकांना जनजागृती कोरोना लसीकरणाबाबत मार्गदर्शन करणारे आदी उपक्रमाबद्दल विविध गावचे पोलिस पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला व जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात असा उपक्रम राबवण्यात येईल असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी पुसेगाव पोलिस स्टेशनचे सो. स. फौ. येवले, पो.हवा. खाडे, भोसले, पो.ना. गंबरे , सरक, भोसले ,सुतार , पो. ना. जगताप, अबदागिरी, पो. हवा.जाधव,म .पो .ना. भोसले,म. पो. शि. कुंभार, सर्व पोलिस अधिकारी ,कर्मचारी महिला पोलीस व आदी कार्यक्रमास हजर होते.
Comments
Post a Comment