रामेश्वरडोंगर व तळेश्वर परिसरात डोंगरची काळी मैना बहरली
रामेश्वरडोंगर व तळेश्वर परिसरात डोंगरची काळी मैना बहरली
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
खटाव तालुक्याच्या पश्चिम भागात रामेश्वर व तळेश्वर डोंगर परिसरात डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे खटाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगर भागात या वर्षी तसेच वर्षानुवर्ष बहरत असते मात्र गावरान आंब्याला पाड लागण्याच्या आधी यंदा या करवंदेला चांगलाच पाड लागल्याने रामेश्वर व तळेश्वर डोंगर परिसरात करवंदीच्या जाळया भरून निघाली आहेत या करवंदाचा आनंद घेण्यासाठी विसापूर, बुधावलेवाडी ,आवारवाडी, रेवळकरवाडी ,खातगुन, मेगलदरवाडी ,जाखणगाव, जांब , बिटलेवाडी, गाववाडी, पांढरवाडी आधी परिसरातील लहान मुलासहित अबालवृद्ध याचा आनंद घेत असतात यंदा वादळी उन्हाळी पाऊस झाल्यामुळे करवंदाच्या जाळ्या फुलून गेले आहेत तर त्याच्याबरोबर डोंगर भागातील टेंबरे व धामणी अशा झाडांची फळे खाण्यासाठी उपलब्ध झाली आहेत तर विविध रंगीबिरंगी झाडांची फुले डोंगर भागात फुलत असल्याने पर्यटकांनाही याचा आनंद घेता येत आहे
Comments
Post a Comment